ETV Bharat / state

जळकोटमध्ये गणेश मूर्तींची स्थापना, भक्तांच्या उत्साहावर मात्र दुष्काळाचे सावट

author img

By

Published : Sep 11, 2019, 4:46 PM IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम यावर्षीच्या गणेश उत्सवातील देखाव्यावर आणि उपक्रमावर झाला आहे. जळकोट तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश मूर्तींची स्थापना झाली मात्र, कार्यक्रम आणि देखाव्यांकडे जळकोटच्या गणेश मंडळांनी दुर्लक्ष केले आहे.

दुष्काळाचे सावट

लातूर - गणेशोत्सव म्हणजे तरुणाईचा उत्साह आणि कार्यक्रमांची रेलचेल असे समीकरण असते. मात्र, लातूर जिल्ह्यातील काही तालुके याला अपवाद राहिले आहेत. तर, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम यंदाच्या देखाव्यावर आणि उपक्रमावर झाला आहे. जळकोट तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्तींची स्थापना झाली मात्र, कार्यक्रम आणि देखाव्यांकडे मंडळांनी दुर्लक्ष केले आहे.

जळकोट तालुक्यातील गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

मागील दोन वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक अडचणीत आहे. तर, यंदाही पावसाचे प्रमाण कमी असल्याने गणेशोत्सव सर्वसाधारणपणे साजरा करीत असल्याचे गणेश मंडळाकडून सांगण्यात येत आहे. गणेश विसर्जनाला अवघे दोन दिवस बाकी असताना शहरातील गणेश मंचासमोर ना देखावे ना कार्यक्रम अशी स्थिती आहे.

जळकोट तालुक्यात एकूण ३६ मंडळाकडून गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक मंडळाच्या गणपतीजवळ रोषणाई, देखावा अथवा लाऊडस्पीकर इत्यादींचा वापर टाळण्यात आला आहे. तसेच विसर्जनातसुध्दा पारंपरिक वाजंत्रीचा वापर करणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यासोबतच जळकोट तालुक्यात देखील गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. तर, लातूर पोलिसांकडून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून जळकोट तालुक्यातील २६ गावात ही संकल्पना यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे.

Intro:बाईट : 1) गणेश सोंडारे (पोलीस निरीक्षक जळकोट पोलीस ठाणे )
2) गणेश भक्त

जळकोटमध्ये गणेश मूर्तींची स्थापना, भक्तांच्या उत्साहावर मात्र दुष्काळाचे सावट
लातूर : गणेशउत्सव म्हणजे तरुणाईचा उत्साह आणि कार्यक्रमांची रेलचेल.. मात्र, लातूर जिल्ह्यातील काही तालुके याला अपवाद राहिले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम यंदाच्या देखाव्यावर आणि उपक्रमावर झाला आहे. जळकोट तालुक्यात दरवर्षप्रमाणे यंदाही गणेश मूर्तींची स्थापना झाली खरी मात्र, कार्यक्रम आणि देखाव्यांकडे मंडळांनी दुर्लक्ष केले आहे.Body:मागील दोन वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक अडचणीत आहे. यंदाही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हा उत्सव सर्वसाधारण पणे साजरा करीत असल्याचं गणेश मंडळाकडून सांगण्यात येतंय. गणेश विसर्जनाला अवघे दोन दिवस बाकी असताना शहरातील गणेश मंचासमोर ना देखावे ना कार्यक्रम अशी स्थिती आहे. जळकोट तालुक्यात एकूण ३६ मंडळाकडून श्रीची स्थपणा करण्यात आलीय. प्रत्येक मंडळाच्या गणपती जवळ रोषणाई, देखावा अथवा लॉड़ीस्पिकरचाही वापर करण्यात आला नाही. विसर्जन सुध्दा पारंपरिक वाजंत्रीचा वापर करणार असल्याचं मंडळाकडून सांगिन्यांत आलंय ! त्यामुळे जळकोट तालुक्यातील गणेशउत्सवावर दुष्काळाची छाया पडल्याची चित्र आहे. Conclusion:लातूर पोलिसांकडून एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवण्यात आलीय त्यात जळकोट तालुक्यातिल २६ गावात एकगाव एक गणपती हि संकल्पना यशस्वी झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.