ETV Bharat / state

लातुरात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन, जुन्या शासकीय इमारतीत दररोज होणार विक्री

author img

By

Published : Aug 16, 2020, 3:33 PM IST

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात 2 हजारहून अधिक शेती गट तयार करण्यात आले आहेत. रानभाज्या महोत्सवात ज्या गटांनी रासायनिक खतांच्या मदतीने उत्पादन घेतले, आशा ७० गटातील महिलांनी, तसेच जंगली फळ उत्पादकांनी सहभाग घेतला आहे.

रानभाज्या महोत्सव
रानभाज्या महोत्सव

लातूर- फास्टफूडच्या जमान्यात नागरिकांना गावरान रानभाज्यांचा विसर पडत आहे. लोकांना रानभाज्यांचे प्रकार व त्यांच्या पौष्टिक गुणांची माहिती व्हावी यासाठी शहरातील औसा रोडजवळील कल्पतरू मंगल कार्यालयजवळ रानभाज्या आणि जंगली फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे रानभाज्या उद्योजकांना बाजारपेठ मिळाली असून जुन्या जिल्हाधिकारी परिसरात रोज रानभाज्यांची विक्री देखील केली जाणार आहे.

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात 2 हजारहून अधिक शेती गट तयार करण्यात आले आहेत. रानभाज्या महोत्सवात ज्या गटांनी रासायनिक खतांच्या मदतीने उत्पादन घेतले, आशा ७० गटातील महिलांनी, तसेच जंगली फळ उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मांडण्यात आल्या आहेत. शहरातील लॉकडाऊन हटविल्यानंतर पहिल्याच दिवशी या मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे, लातूरकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला हजेरी लावली. शिवाय, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नागरिकांनी रानभाज्यांची खरेदीही केली.

माहिती देताना जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने

जुन्या जिल्हाधिकारी परिसरात रानभाज्यांची दररोज होणार विक्री

हा महोत्सव एका दिवसापुरताच मर्यादित न राहता या भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता शहरातील जुन्या जिल्हाधिकारी परिसरात रानभाज्यांची आणि जंगली फळांची दररोज विक्री केली जाणार आहे. त्यामुळे, या महोत्सवाचा उद्देश साधण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी व्यक्त केला आहे.

शेती गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम

शेती गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. गेल्या ४ महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये या गटातील महिलांनी गावोगावी जाऊन रानभाज्यांची विक्री केली आहे. याच भाज्यांना शहरात देखील मागणी आहे. मात्र, आवश्यकता होती ती बाजारपेठेची. आता बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने उत्पादन पदरी पडेल, असा आशावाद महिलांना आहे.

हेही वाचा- लातुरातील बाजारपेठेत लगबग; नियम-अटीसह लॉकडाऊनमध्ये शिथिलता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.