लातूर - शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नराधम बापानेच पोटच्या २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलींच्या आईनेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई सुरू आहे.
रविवारी दुपारी २ च्या सुमारास राहत्या घरी मुलींच्या वडिलाकडून अत्याचार होत असल्याची बाब मुलींच्या आईच्या निदर्शनास आली. या दोन्हीही मुली अल्पवयीन असून एकीचे वय ८ तर दुसरीचे साडेचार वर्षे आहे. यासंबंधी मुलींच्या आईने सोमवारी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधमविरोधात तक्रार दिली. यावरून बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
मुलींचा वडील हा मजूर आहे. तर दुपारच्या त्या घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस हेडकॉन्स्टेबल मुंडे हे अधिक तपास करीत आहेत.