ETV Bharat / state

एक तपापासून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा

तकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन उभारण्यात आलेला 'जय जवान, जय किसान' हा सहकारी साखर कारखाना गेल्या 12 वर्षापासून बंद आहे. अंतर्गत राजकारणामुळेच हा कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आणि सभासद देशोधडीला लागले आहेत. हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी मेळावा घेतला.

एक तपापासून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा
author img

By

Published : Jun 7, 2019, 5:50 PM IST

लातूर - शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन उभारण्यात आलेला 'जय जवान, जय किसान' हा सहकारी साखर कारखाना गेल्या 12 वर्षापासून बंद आहे. अंतर्गत राजकारणामुळेच हा कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आणि सभासद देशोधडीला लागले आहेत. हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी मेळावा घेतला.

एक तपापासून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा

चाकूरसह अहमदपूर, उदगीर आणि देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना या करखाण्यामुळे शेती व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली होती. 1982 साली हा साखर कारखाना उभारण्यात आला होता. याकरिता परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी देऊ केल्या होत्या. कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वकाही सुरळीत होते. मात्र, कारखान्यांचे खासगीकरण वाढले आणि या सहकारी कारखान्याला घरघर लागली. केवळ खासगी कारखान्याच्या माध्यमातून अर्थार्जन करण्याच्या उद्देशानेच लोकप्रतिनिधींनीच हा कारखाना बंद पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांसह सभासदांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने का होईना कारखाना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी आज बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कारखाना सुरू असताना शेती व्यवसायात झालेली प्रगती आणि त्यानंतर होत असलेले हाल याचा पाढा वाचून दाखवला. शिवाय हक्काचा कारखाना असतानाही येथील शेतकऱ्यांना इतर कारखान्यावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे 1215 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्याविषयी प्रतिज्ञा घेतली. सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास आगामी काळातही मेळावे, आंदोलने घेऊन लढा कायम ठेवला जाणार असल्याचे बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितले.

Intro:एक तपापासून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा
लातूर : शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन उभारण्यात आलेला जय जवान, जय किसान हा सहकारी साखर कारखाना गेल्या 12 वर्षापासून बंद आहे. अंतर्गत राजकारणामुळेच हा कारखाना बंद पडला असून हजारो शेतकरी आणि सभासद देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी मेळावा घेतला.

Body:चाकूरसह अहमदपूर, उदगीर आणि देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना या करखाण्यामुळे शेती व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली होती. 1982 साली हा साखर कारखाना उभारण्यात आला होता. याकरिता परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी देऊ केल्या होत्या. कारखान्याच्या सुरवातीच्या काळात सर्वकाही सुरळीत होते मात्र, कारखान्यांचे खाजगीकरण वाढले आणि या सहकारी कारखान्याला घरघर लागली. केवळ खाजगी कारखान्याच्या माध्यमातून अर्थार्जन करण्याच्या उद्देशानेच लोकप्रतिनिधींनीच हा कारखाना बंद पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे मात्र शेतकऱ्यांसह सभासदांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने का होईना कारखाना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीला घेऊन आज बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कारखाना सुरू असताना शेती व्यवसायात झालेली प्रगती आणि त्यानंतर होत असलेले हाल याचा पाढा वाचून दाखवला. शिवाय हक्काचा कारखाना असतानाही येथील शेतकऱ्यांना इतर कारखान्यावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे 1215 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे.

Conclusion:यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्याविषयी प्रतिज्ञा घेतली. सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास आगामी काळातही मेळावे, आंदोलने घेऊन लढा कायम ठेवला जाणार असल्याचे बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.