ETV Bharat / state

विकतच्या पाण्यावर जोपासलेली टोमॅटो जनावरांपुढे ; वावरातच लाल चिखल

author img

By

Published : Apr 22, 2020, 7:12 PM IST

टोमॅटोला स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लातूरमधील शेतकऱ्याने तर टोमॅटोच्या पिकाचे चक्क जनावरे चरायला सोडली. काढणीचा खर्चही परवडत नसल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला.

Farmer scrap his tomato crop in Latur
विकतच्या पाण्यावर जोपासलेली टोमॅटो जनावरांपुढ

लातूर - कोरोनामुळे उद्भवलेल्या परस्थिती सर्वाधिक नुकसान झाले आहे ते शेतीमालाचे. यामध्ये फळबागा, भाजीपाला याचा समावेश असून एकरभर टोमॅटोच्या शेतात चक्क मेंढरं सोडल्याचा प्रकार चाकुर तालुक्यातील जानवळ येथे समोर आला आहे. काढणीचा खर्चही परवडत नसल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दळणवळण बंद असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. सध्या ग्रीनझोनमधील जिल्ह्यात अंशता सूट देण्यात आली असली तरी मुख्य पिकांनाच प्राधान्य दिले जात आहे. गेल्या महिन्याभरात द्रक्षाच्या बागा आणि भाजीपाल्याचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. जानवळाच्या. शेतकऱ्याने तर एकरभर शेतातील टोमॅटो न काढताच त्यामध्ये मेंढर सोडली आहेत. त्यामुळे किमान पुढील उत्पादन घेण्यासाठी शेतर तरी रिकामे होईल, यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

नितीन साखरे यांनी एकरभर टोमॅटोसाठी १ लाखाचे कर्ज काढले होते. तर दरम्यानच्या कालावधीत पाणी कमी पडत असल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून विकतचे पाणी घेऊन जोपासना केली होती. आता टोमॅटो बाजारात दाखल होणार तेवढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि साखरे यांचा टोमॅटो वावरातच राहिला. स्थानिक बाजारपेठेत माल विक्री करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतू, बाजारभाव गडगडले आणि काढणीचा खर्चही परवेडना झाला. त्यामुळे दोन दिवसांपासून या टोमॅटोत त्यांनी जनावरं सोडली आहेत. टोमॅटोच्या उत्पादनावर त्यांनी एक ना अनेक कामे करण्याचा ध्यास घेतला होता. मात्र, एक रुपयाही या उत्पन्नातून पदरी पडलेला नाही. साखरेंसारख्या अनेक शेतकऱ्यांचे यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परस्थितीने नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.