ETV Bharat / state

लातूर: महानगरपालिकेची एकच शाळा सुरू; दिड महिन्यात एकाही विद्यार्थ्याला कोरोना नाही

author img

By

Published : Feb 20, 2021, 4:33 PM IST

लातूर शहरात महानगरपालिकेच्या 21 शाळा आहेत. मात्र, सद्यास्थितीत केवळ एक शाळा आणि ती ही नियम अटींमध्ये सुरू आहे. स्वच्छता, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेने घेतलेल्या काळजीमुळे एकाही विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झालेली नाही.

Government School Latur
सरकारी शाळा लातूर

लातूर - लॉकडाऊननंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वी सरकारने घालून दिलेल्या नियम-अटींची पूर्तता करताना विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी घेतलेले परिश्रम महत्वाचे ठरत आहेत. लातूर शहरात महानगरपालिकेच्या 21 शाळा असून या पैकी एक शाळा सद्यास्थितीत सुरू आहे. पण, गेल्या दीड महिन्यात एकाही विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाली नाही, हे विशेष.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. शिक्षण क्षेत्रावर तर तो अधिकच झाला असून, आता कुठे दीड महिन्यापासून शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये केवळ शाळांचे वेळापत्रकच बदलले नाही, तर विद्यार्थ्यांना आपल्या नेहमीच्या वागणुकीत देखील बदल करावे लागले आहेत. लातूर शहरात महानगरपालिकेच्या 21 शाळा आहेत. मात्र, सद्यास्थितीत केवळ एक शाळा आणि ती ही नियम अटींमध्ये सुरू आहे. स्वच्छता, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेने घेतलेल्या काळजीमुळे एकाही विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झालेली नाही.

हेही वाचा - चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवले, चाकूरमधील घटना

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, इयत्ता 5 वी ते 10 वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी असल्याने शहरातील एकच शाळा सुरू आहे. लॉकडाऊनपूर्वी आणि आताची शाळा यामध्ये खूप बदल झाल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच नियमित अंतरावर विद्यार्थ्यांना एका लाईनमध्ये उभे राहावे लागते.

ठरवून दिलेल्या जागेवरच विद्यार्थ्यांना बसावे लागते

तापमान तपासणी, त्यानंतर सॅनिटायझर हे आता नित्याचेच झाले आहे. पण, इतर विद्यार्थ्यांशी किंवा अन्य कर्मचारी यांच्याशी संपर्क होऊ नये म्हणून वर्गांमध्ये ठरवून दिलेल्या जागेवर आणि अंतरावरच विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. एवढेच नाही तर, 11 ते 3 या शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना जेवणाचा डबाही घेऊन जाता येत नाही आणि सर्व सूचनांचे पालन होत असल्यानेच आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

आरोग्य तपासणी करूनच वर्गात प्रवेश

महानगरपालिका शाळा नं. 9 या शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. तर, शिक्षक, शिक्षिका हे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना वर्गात प्रवेश देत आहेत. केवळ खासगी शाळांमध्ये आणि क्लासेसमधेच नाहीतर सरकारी शाळांमध्ये योग्य ती काळजी घेतली जात आहे. शिक्षकांनी केलेल्या सूचनांचे पालनही विद्यार्थी करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. दुपारी 2 वाजता शाळा सुटल्यानंतर प्रत्येक वर्गाची स्वच्छता केली जाते. शिवाय आरोग्य विभागाच्या वतीने आठवड्याला आरोग्य शिबीरही आयोजित केले जाते. आता पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पण, सरकारी शाळेत अशाप्रकारे काळजी घेतली तर कोरोनाचा धोका राहणार नाही आणि शाळा सुरू राहील हे नक्की.

एक दिवस मुली, तर एक दिवस मुलांना शिक्षणाचे धडे

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्लासेस चालकांनी एक दिवस केवळ मुली तर एक दिवस मुलांना शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येण्याची मुभा दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद विभागात रुग्णसंख्या वाढत असल्याने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश शासनस्तरावारून दिले जात आहे.

हेही वाचा - जळकोटमध्ये शिक्षक-प्राध्यापकांनाच कोरोनाची लागण, विद्यार्थी-पालकांमध्ये घबरहाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.