ETV Bharat / state

अन्.. विद्यार्थिनी परीक्षा केंद्राऐवजी थेट रुग्णालयात; अपघातामुळे बारावीच्या पहिल्या पेपरला मुकली 'गंगा'

author img

By

Published : Feb 18, 2020, 3:30 PM IST

दयानंद महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत बारावीच्या परिक्षेला जात असताना तिचा अपघात झाला. त्यामुळे तिला परिक्षा हॉलमध्ये जाण्याऐवजी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले.

hsc exam
अन्.. विद्यार्थिनी परीक्षा केंद्राऐवजी थेट रुग्णालयात; अपघातामुळे बारावीच्या पहिल्या पेपरला मुकली 'गंगा'

लातूर - आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. याची लगबग सर्वच केंद्रावर पाहवयास मिळत होती. सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रावर एकवटले असताना लातुरातील गंगा नावाच्या विद्यार्थिनीला मात्र, रुग्णालयात दाखल व्हावे लागले. परीक्षा केंद्र 1 किमी अंतरावर असतानाच दुचाकीवरुन मार्गस्थ होणारी गंगा वाहनाला धडकली. यामध्ये ती जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे जखमी झाल्याच्या वेदना आणि दुसरीकडे परीक्षेला मुकावे लागत असल्याचे दडपण गंगाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

हेही वाचा -

शीना बोरा प्रकरणात माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा देवेन भारतींवर खळबळजनक आरोप

शहरातील गंगा सेन ही दयानंद महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी पाच नंबर चौकात राहत आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर असून ती मैत्रीणीबरोबर सरस्वती कॉलनीतील शिवाजी विद्यालयात परीक्षेसाठी जात असताना एक नंबर चौकात एका वाहनाला अपघात झाला. यामध्ये गंगाच्या पायाला आणि डोक्याला मार लागला आहे. त्यामुळे ती परीक्षेला जाऊ शकत नाही. दरम्यान, लातूर बोर्डाचे सचिव उकिरडे यांनी रुग्णालयात विद्यार्थिनीची भेट घेतली आणि परीक्षा देण्यासाठी तु सक्षम असली तर या ठिकाणीच परीक्षा देण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले. मात्र, संबंधित डॉक्टर आणि गंगानेही परीक्षा देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे इंग्रजी पेपरला गंगा मुकली असली तरी उर्वरित पेपरचे काय होणार असा प्रश्न आहे. मात्र, यामुळे गंगाचे हे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. कारण तिला जुलै मध्ये परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे गंगाने मानसिक तणाव न घेता आराम करण्याचा सल्लाही डॉक्टर यांनी दिला आहे.

मात्र, पहिल्याच पेपरला अशाप्रकारे मुकावे लागल्याचा मानसिक ताण गंगा चेहऱ्यावर होता. बोर्डाचे सचिव उकिरडे यांनी रुग्णालयात येऊन गंगाला आणि तिच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम केले.

हेही वाचा -

धर्माबाद तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.