ETV Bharat / state

अखेर डॉ. राहुल पवारची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान औरंगाबादमध्ये मृत्यू

लातूरच्या एमआयटी मेडीकल कॉलेजचा कोरोनाबाधित विद्यार्थी डॉ. राहुल पवारचा औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालायात उपचार सुरू असताना आज अखेर मृत्यू झाला आहे. राहुल पवार याचे वय अवघे 25 वर्ष होते. तो 'एमबीबीएस'च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. राहुलला कोरोनाची लागण झाल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान राहुल पवारचा मृत्यू
उपचारादरम्यान राहुल पवारचा मृत्यू
author img

By

Published : May 26, 2021, 9:55 PM IST

लातूर - लातूरच्या एमआयटी मेडीकल कॉलेजचा कोरोनाबाधित विद्यार्थी डॉ. राहुल पवारचा औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालायात उपचार सुरू असताना आज अखेर मृत्यू झाला आहे. राहुल पवार याचे वय अवघे 25 वर्ष होते. तो 'एमबीबीएस'च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. राहुलला कोरोनाची लागण झाल्याने गेल्या 20 ते 25 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

राहुल पवारचा जन्म परभणी जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्याचे आईवडील ऊसतोड मजुर आहेत. परिस्थितीशी दोन हात करत त्याने शिक्षण घेतले, गावातून तो पहिलाच डॉक्टर बनणार होता. मात्र एप्रिल महिन्यात परीक्षेच्या घाईगडबडीत त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाचे उपचार सुरू असताना त्याला म्युकरमायकोसीसची देखील लागन झाली. आजार अधिक बळावत गेल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

'ई-टीव्ही भारत'ने दि.18 मे, 2020 रोजी 'ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉ. राहुल पवारची मृत्यूशी झुंज सुरूच' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. सोबतच त्याच्या उपचारासाठी मदतीचे देखील आवाहन केले होते. बातमीचा 'इम्पॅक्ट' म्हणून दोन दिवसांत तब्बल 2 लाख 76 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट राहुलच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा देखील झाली होती. शिवाय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी 'ई-टीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेत राहुल पवारच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज राहुलचा मृत्यू झाला.

राहुलच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी

राहुलच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई-वडील व छोटा भाऊ असा त्याचा परिवार आहे. आई-वडील ऊसतोड कामगार असून छोटा भाऊ सचिन 10 वीच्या वर्गात शिकतोय. तोही आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामामध्ये मदत करतोय. राहुलच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी लाखों रुपयांचे कर्ज काढून खर्च केला, मात्र राहुल वाचू शकला नाही, राहुलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे राहुलच्या परिवाराला भविष्यकालीन कायमस्वरुपी आधार म्हणून, त्याच्या लहान भावाला शासकीय सेवेत घेण्यात यावे व कुटुंबीयांना राज्य शासनाने 1 कोटी रुपयांची अर्थिक मदत करावी, अशी मागणी राहुलच्या मित्रांनी केली आहे. नवी दिल्ली येथे डॉ. अनस मुजाहिद या तरुण डॉक्टराचा अशाच परिस्थितीत कोरोनाने मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या तरुण डॉक्टराच्या कुटुंबाला पुनर्वसनासाठी 1 कोटीची अर्थिक मदत केली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनानेही डॉ.राहुल पवारच्या कुटुंबीयांना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - राहायला जागा नसल्याने महिला रिक्षा टेम्पोमध्येच क्वारंटाईन; गंगापूरमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.