ETV Bharat / state

ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉ. राहुल पवारची मृत्यूशी झुंज, कर्ज काढून सुरु आहेत उपचार - MBBS student struggle with corona

राहुल पवार याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई-वडील व छोटा भाऊ असा त्याचा परिवार आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. छोटा भाऊ सचिन 10 वी वर्गात शिकत आहे.

Rahul Pawar
डॉ. राहुल पवार
author img

By

Published : May 18, 2021, 7:24 PM IST

Updated : May 20, 2021, 2:54 PM IST

लातूर - शहरातील एमआयटी कॉलेजमध्ये तृतीय वर्षात एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. डॉ. राहुल विश्वनाथ पवार असे या २५ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. आई-वडील ऊसतोड मजूर असल्याने कर्ज काढून उपचार करण्याची वेळ या विद्यार्थ्यावर आली आहे.

डॉ. राहुल विश्वनाथ पवार हा परभणी जिल्ह्यातील मौजे लिंबा (ता.पाथरी) गावचा होतकरू तरुण आहे. शिकून डॉक्टर व्हायचे, हे स्वप्न उराशी बाळगून परिस्थितीशी दोन हात करत पहिल्यांदाच या गावातून तो एकटाच डॉक्टर झाला. लातूरच्या एमआयटी महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षाही त्याने दिली आहे. परंतु या तरुणाला कोरोनाने गाठले आहे.

डॉ. राहुल पवारची मृत्यूशी झुंज सुरुच

हेही वाचा-देव तारी त्याला कोण मारी! झाड पडून झालेल्या दुर्घटनेत महिला थोडक्यात बचावली; पाहा व्हिडिओ

रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न
राहुल पवार याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई-वडील व छोटा भाऊ असा त्याचा परिवार आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. छोटा भाऊ सचिन दहावी वर्गात शिकत आहे. तोही आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामांमध्ये मदत करत आहे. त्यांच्याच पाठिंब्यावर डॉ. राहुलने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करुन रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न बघितले.

Rahul Pawar
डॉ. राहुल पवार

हेही वाचा-प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड

१ मेपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू-

'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स' या युनिव्हर्सिटीची एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा गतवर्षी एप्रिल महिन्यात पार पडली. मार्च दरम्यान लेखी परीक्षा तर १६ ते २३ मार्च दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा झाली. या दोन्ही परीक्षा राहुलने पुर्ण तयारीनिशी दिल्या आहेत. पण कोरोनाची लक्षणे असतानाही परीक्षा नाही दिल्यास सहा महिने बॅक राहतात. त्यात परिस्थिती हालाखीची असल्याने हे परवडणारे नव्हते. म्हणून राहुलनेही परिक्षेलाच प्राधान्य दिले. परीक्षा झाल्यानंतर राहुलला कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्यामुळे त्याला १ मेपासून औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Doctor Rahul Pawar
डॉ. राहुल पवार

हेही वाचा-मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

दवाखान्याचा खर्च लाखोंच्या पटीत

दिवसेंदिवस राहुलची प्रकृती गंभीर होत आहे. सध्या त्याला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. दवाखान्याचा खर्च लाखोंच्या पटीत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. रुग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत आहे. या दुर्दैवी संकटाला 'परीक्षा पद्धती' की 'राहुलची परिस्थिती' जबाबदार ? असा उद्विग्न करणारा सवाल राहुलचा जवळचा मित्र डॉ. मयुर कावरके याने 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना उपस्थित केला आहे. राहुलच्या उपचारासाठी मदत करण्याचे त्याने आवाहन केले आहे.

Last Updated : May 20, 2021, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.