ETV Bharat / state

लातुरात विद्यमान आमदाराला उमेदवारी जाहीर होताच दिलीप देशमुखांची बंडखोरी

author img

By

Published : Oct 1, 2019, 5:20 PM IST

भाजपकडून विद्यमान आमदार विनायक पाटील यांना उमेदवारी मिळताच भाजपशी एकनिष्ठ असलेले दिलीपराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. शहरातील मुख्य मार्गावर शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला.

दिलीप देशमुख

लातूर - राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्याचे लक्ष असलेल्या अहमदपूर विधानसभा मतदार संघात मोठी रंगत निर्माण होत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार विनायक पाटील यांना उमेदवारी मिळताच भाजपशी एकनिष्ठ असलेले दिलीपराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे नाराज उमेदवारांची बंडखोरी आता चव्हाट्यावर आली आहे.

दिलीप देशमुख

हेही वाचा- विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज

पक्षाशी एकनिष्ठ आणि 2014 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार विनायक पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इच्छुकांची सर्वाधिक गर्दी ही अहमदपूर-चाकूर मतदारसंघात होती. आज अखेर उमेदवारीही आमदार विनायक पाटील यांना जाहीर असतानाच दिलीप देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील मुख्य मार्गावर शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला. तर जिल्हा परिषद समोरच्या मैदानात त्यांनी सभा घेऊन आता लढाई अटळ असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा- रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; आमदार सुरेश लाड यांचा निवडणूक लढवण्यास नकार

यापूर्वीच इच्छुक असलेल्या अयोध्या केंद्रे यांनी पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिला होता. आज दिलीप देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाळीचा फायदा नेमका कुणाला होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आतापर्यंत या मतदारसंघाने अपक्ष उमेदवारांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबासाहेब पाटील यांनाच उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. वंचितकडून आता भाजपात नाराज असलेल्या अयोध्या केंद्रे या नशीब आजमावणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इच्छुकांची गर्दी आणि अपक्षाला निवडून द्यायची या मतदार संघाची परंपरा आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रमुख पक्षाच्या आणि अपक्षांनीही येथून नेतृत्व करण्यासाठी कंबर कसली आहे हे मात्र नक्की.

Intro:अहमदपूर : विद्यमान आमदाराला उमेदवारी जाहीर होताच दिलीप देशमुखांची अपक्ष उमेदवारी
लातूर : विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्याचे लक्ष असलेल्या अहमदपूर विधानसभा मतदार संघात मोठी रंगत निर्माण होत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार विनायक पाटील यांना उमेदवारी मिळताच भाजपाशी एकनिष्ठ असलेले दिलीपराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे नाराज उमेदवारांची बंडखोरी आता चव्हाट्यावर आली आहे.

Body:पक्षाशी एकनिष्ठ आणि 2014 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. विनायक पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इच्छुकांची सर्वाधिक गर्दी ही अहमदपूर-चाकूर मतदारसंघात होती. आज अखेर उमेदवारी ही आ. विनायक पाटील यांना जाहीर असतानाच दिलीप देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील मुख्य मार्गावर शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला. तर जिल्हा परिषद समोरच्या मैदानात त्यांनी सभा घेऊन आता लढाई अटळ असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापूर्वीच इच्छुक असलेल्या अयोध्याताई केंद्रे यांनी पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिला होता. आज दिलीप देशमुख यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाळीचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आतापर्यंत या मतदारसंघाने अपक्ष उमेदवारांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबासाहेब पाटील यांनाच उमेदवारी जवळपास निश्चित झाले आहे. वंचितकडून आता भाजपात नाराज असलेल्या अयोध्याताई केंद्रे या नशीब आजमीवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इच्छुकांची गर्दी आणि अपक्षाला निवडून द्यायची या मतदार संघाची परंपरा आहे. त्यामुळे नेमके काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Conclusion:प्रमुख पक्षाच्या आणि अपक्षांनीही येथून नेतृत्व करण्यासाठी कंबर कसली आहे हे मात्र नक्की....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.