ETV Bharat / state

लातूर : वलांडीसह परिसरात डेंग्यूचे थैमान, तीन बालकांचा मृत्यू - Latour Latest News

देवणी तालुक्यात सघ्या हिवताप, मलेरिया, डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे तालुक्यात तिसऱ्या बालकाचा मृत्यू झाला आहे.

वलांडी सह परिसरात डेंग्यूने थैमान
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:46 PM IST

लातूर - तालुक्यात सद्या हिवताप, मलेरिया, डेंग्यू या रोगाची लागण झाली आहे. यात आता तालुक्यातील तिसऱ्या चिमुकल्याचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे आजारी असलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील औराद शहाजनी येथे आठवड्यापूर्वी एकाचा बळी गेला होता. आता देवणी तालुक्यातील हिसामनगर व वलांडी येथेही दोन घटना ताज्या असतानाच बुधवारी सकाळी वलांडी येथील दर्शन केशव कारले (वय.१२) चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण झाले आहे.

वलांडी सह परिसरात डेंग्यूने थैमान

हिसामनगर येथील शहाजान दस्तगीर शेख, तर वलांडी येथील नाजीया जलील पटेल यांचा या आठवड्यात मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापुर्वी वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले होते.त्यावेळी दोन दिवस पथक भेट देवुन पहाणी केली पण उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप सरपंच विजयकुमार मुके व वलांडीचे सरपंच प्रा.महेमुद सौदागर यांनी वेळोवेळी केला आहे. अबेटींग फवारणीही अर्धवटच आहे. केवळ पाणीसाठे, नाल्याची पहाणी करुन गावातील आजारी असलेल्या व्यक्तीची माहिती घेतली. मात्र, प्रशासनाकडुन ठोस उपाययोजना न झाल्याचा रोष ग्रामस्थातुन व्यक्त होत आहे. शिवाय दवाखान्यात किट किंवा अबेंटीग संपले असल्याने नागरिकांना खाजगी दवाखाने गाठावा लागतो आहे.

हा रोग घरात डास अळी झाल्यास उदभवतो. केलेल्या पाहणीत प्रत्येक घरात डास अळ्या आहेत. शिवाय गावात असलेल्या निकामी टायरमुळे याचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तीव्र ताप, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहान तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप गुरमे यांनी केले आहे.

पथक मुक्कामी तैनात -

गावाचे सर्वेक्षण चालु आहे. गावातील रुग्णाची माहिती घेण्यात येत आहे. अबेटींगच्या दोन फेऱ्या झाल्या असुन ग्रामस्थानी स्वच्छता राखावी. दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा पाच दिवसाचे विशेष पथक तयार केले आहे. गुरुवारी मी भेट देणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी आर.आर.शेख यांनी सांगितले.

तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना -

याबाबत उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्याशी संपर्क साधला असता आजच आपण जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत असे सांगितले .

या तिन्ही घटना घडल्याची चर्चा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. वलांडी प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी बुधवारपासुन वलांडीसह हिसामनगरात तपासणिसाठी रवाना झाले.गावात अबेटींग सुरु केल्याची माहिती चिल्लरगे यांनी दिली. शिवाय या तिघाचाही मृत्यु कशामुळे झाला त्या मृतांचा रिपोर्ट आल्यानंतर कळेल अशी माहिती आरोग्य विभागानी दिली.

वलांडी गावासह परिसरातील तिन बालकांचा बळी गेल्यानंतर लातूरचे १०० आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे पथक वलांडी येथे दाखल झाले आहेत. काळजी म्हणून धूर फवारणी लिक्विड फवारणी ग्राम पंचायत करत आहे. खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. शंभर पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाल्याची माहिती आहे.

Intro:वलांडी सह परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून यामुळे तिन बालकांचा बळी गेला आहे.Body:देवणी तालुक्यात डेंग्युचा तिसरा बळी ?
नागरिक धास्तावले.., ,प्रशासन सुस्तावले...

देवणी ,प्रतिनिधी ः तालुक्यात सद्या हिवताप ,मलेरिया ,डेंग्यु या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात थैमान घातली आहे.यात आता तालुक्यातील तिसऱ्या चिमुकल्याचा डेंग्युमुळे मृत्यु झाल्याची घटना घडली .यामुळे आजारी असलेल्या लोकांत भितीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील औराद शहाजनी येथे आठवड्यापुर्वी एकाचा बळी गेला होता.आता देवणी तालुक्यातील हिसामनगर व वलांडी येथेही दोन घटना ताज्या असतानाच बुधवारी सकाळी वलांडी येथील दर्शन केशव कारले वय १२ वर्ष चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण झाले आहे.
हिसामनगर येथील शहाजान दस्तगीर शेख .तर वलांडी येथील नाजीया जलील पटेल यांचा या आठवड्यात मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यापुर्वी पुढारीने याबाबत वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले होते.त्यावेळी दोन दिवस पथक भेट देवुन पहाणी केली पण उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप सरपंच विजयकुमार मुके व वलांडीचे सरपंच प्रा.महेमुद सौदागर यांनी वेळोवेळी केला आहे.अबेटींग फवारणीही अर्धवटच आहे.केवळ पाणीसाठे ,नाल्याची पहाणी करुन गावातील आजारी असलेल्या व्यक्तीची माहिती घेतली .पण प्रशासनाकडुन ठोस उपाययोजना न झाल्याचा रोष ग्रामस्थातुन व्यक्त होत आहे. शिवाय दवाखान्यात किट किंवा अबेंटीग संपले असल्याने नागरिकांना खाजगी दवाखाने गाठावे लागते.
डंक छोटा....धोका मोठा....प्रशासन
हा रोग घरात डास अळी झाल्यास उदभवतो.केलेल्या पहाणीत प्रत्येक घरात डासअळ्या आहेत शिवाय गावात असलेल्या निकामी टायरमुळे याचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.तीव्र ताप ,अंगदुखी ,मळमळ ,अंगावर पुरळ येत असेल तर तात्काळ डाँक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहान तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप गुरमे यांनी केले आहे.
पथक मुक्कामी तैनात....
गावातील सर्वेक्षण चालु आहे.गावातील रुग्णाची माहिती घेण्यात येत आहे.अबेटींगच्या दोन फेऱ्या झाल्या असुन ग्रामस्थानी स्वच्छता राखावी...दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा पाच दिवसाचे विशेष पथक तयार केले आहे.गुरुवारी मी भेट देणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी आर.आर.शेख यांनी सांगितले.
तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना...
याबाबत उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्याशी संपर्क साधला असता आजच आपण जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत असे सांगितले .

या तिन्ही घटना घडल्याची चर्चा तालुक्यात वार्यासारखी पसरली आहे वलांडी प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी बुधवारपासुन वलांडीसह हिसामनगरात तपासणिसाठी रवाना झाले.गावात अबेटींग सुरु केल्याची माहिती चिल्लरगे यांनी दिली.शिवाय या तिघाचाही मृत्यु कशामुळे झाला त्या मयताचा रिपोर्ट आल्यानंतर कळेल अशी माहिती आरोग्य विभागानी दिली दिली.Conclusion:वलांडी गावासह परिसरातील तिन बालकांचा बळी गेल्यानंतर लातूरचे शंभर आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे पथक वलांडी आज दाखल झाले आहे.काळजी म्हणून धूर फवारणी लिक्विड फवारणी ग्राम पंचायत करत आहे.खाजगी रूग्णालयात रूगूणांच्या रांगा लागल्या आहेत तर शंभर पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाल्याची माहिती आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.