लातूर - जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व काही हिसकावून घेतले आहे. या नुकसानीनंतर जिल्ह्यात आमदार, खासदार यांची पीक पाहणीसाठी रीघ लागली आहे. पावसाने खरिपाच मोठे नुकसान झाले आहे. आभाळ फाटल्यागत पाऊस झाला असून आता सरकारनेच मदतीचा हात देऊन या संकटातून बाहेर काढण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा - मराठवाड्यात अतिवृष्टी : देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर
निलंगा तालुक्यातील सावरी, सोनखेड, मानेजवळगा, तागडखेडा, औराद, चांदुरी या शिवारातील पिकांचे तर नुकसान तर झालेच आहे. पण पाणी साचल्याने भविष्यात रब्बी हंगामातही उत्पादन घेता येईल का नाही, अशी अवस्था झाली आहे. मंत्री गावात येणार म्हटल्यावर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने त्यांची वाट पाहत आहेत.