लातूर - औसा रोडवरील 'रिलायन्स स्मार्ट स्टोअर' मॉलवर लातूर शहर महानगरपालिकेने कारवाई केली. तसेच, 50 हजार रूपयांचा दंडही वसूल केला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशान्वये विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लातूर शहरातील औसा रोडवरील 'रिलायन्स स्मार्ट स्टोअर' या मॉलमध्ये एकाचवेळी 50 कामगार एकत्रित काम करत असल्याची माहिती मनपा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानंतर तत्काळ पालिका प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, लातूर महानगरपालिकेने लॉकडाऊनमध्ये एका मॉलवर केलेली ही मोठी व पहिलीच कारवाई आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा प्रशासन अधिकारी सतिश शिवणे यांच्या सुचनेवरुन विकेंड लाॅकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिलायन्स स्मार्ट स्टोअरवर लातूर शहर महानगरपालिका व शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केली. तसेच, 50 हजार रुपयांचा दंडही वसूल केला.
हेही वाचा - सावळागोंधळ! पश्चिम बंगालमध्ये मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत