ETV Bharat / state

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव; बोरी गावात 5 दिवसाचा जनता कर्फ्यू

लातूर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लातूर तालुक्यातील बोरी गावात 30 हुन अधिक रुग्ण झाल्याने 5 दिवसाचा जनता कर्फ्यु करण्यात आला आहे.

Bori village, 5-day public curfew
बोरी गावात 5 दिवसाचा जनता कर्फ्यु
author img

By

Published : Oct 2, 2020, 5:51 PM IST

लातूर- जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लातूर तालुक्यातील बोरी गावात 30 हुन अधिक रुग्ण झाल्याने 5 दिवसाचा जनता कर्फ्यु करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठी गावाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 2 हजार 800 जण हे कोरोनाशी लढा देत आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 हजाराहून अधिक झाली आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत. दिवसाकाठी 250 ते 300 रुग्णांची भर पडत आहे. दिलासायक बाब म्हणजे उपचार घेऊन घरी परातणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून बोरी गावात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गावची लोकसंख्या कमी असतांनाही रुग्णांची संख्या 30 वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावामध्ये 5 दिवसांचा जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. सर्व ग्रामस्थांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात आला असून गावात कमालीची शांतता आहे. केवळ शेती कामासाठी परवानगी असल्याने दिवस उजाडताच ग्रामस्थ शेताकडे जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.