लातूर: स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात Vilasrao Deshmukh Government Medical Hospital मेंदूच्या कर्करोगावर Latur Government Hospital (ब्रेन ट्युमर) अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीची व खर्चिक अशी शस्त्रक्रिया प्रथमच पार पडली असून ही शस्त्रक्रिया मेंदू विकार तज्ञ डॉ.नितीन मनोहर बरडे यांनी दोन वृद्धांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया cancer surgery केली आहे.
सर्व प्रकारच्या आजारावर उपचार मागील अनेक वर्षापासून लातूर येथील शासकीय रुग्णालयात मेंदू विकार तज्ञ (न्युरोसर्जन) हे उपलब्ध नव्हते. परंतु मागील 4 महिन्यापूर्वी लातूरचेच भूमिपुत्र असलेल्या डॉ.नितीन बरडे यांची शासकीय रुग्णालयात नियुक्ती झाली असून मेंदूच्या सर्व प्रकारच्या आजारावर उपचार केले जात आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील एक 60 वर्षाच्या आजी मेंदूच्या कर्करोगाची गाठ त्यांच्या मेंदूमध्ये पसरून कवटीच्या बाहेर आल्याच्या स्थितीत शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्याही सर्व तपासणी करुन शस्त्रक्रिया केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत या दोन्ही शस्त्रक्रियामाध्ये रुग्णांचे वय जास्त होते व मेंदूच्या कर्करोगाचा गंभीर स्वरूपाचा चौथ्या स्टेजचा आजार असल्यामुळे या आजाराच्या शस्त्रक्रियेमधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप कमी असते. पण मेंदू तज्ञ डॉ. नितीन बरडे, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. जी एल अनमोल, डॉ.जी एस स्वामी, डॉ. मेघराज चावडा, डॉ. आर.जे. कासले, भूलतज्ञ डॉ.शैलेंद्र चव्हाण, डॉ.जोशी, डॉ.देशमुख व परिचर्या यांच्या सहाय्याने रुग्णांच्या ब्रेन ट्युमरच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या असून या दोनही शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या आहेत.
रुग्णांनी शस्त्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन अशा प्रकारची शस्त्रक्रिया लातूरच्या स्व.विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच झाली असून मेंदूच्या विकाराचे तज्ञ डॉक्टरही उपलब्ध झाले असल्याने मेंदूच्या कर्करोगाच्या रुग्णांनी शस्त्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी केले आहे.