ETV Bharat / state

हक्काच्या जागेवर शिवसेनेचाच दावा - चंद्रकांत खैरे

भाजप सेना युतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. औसा मतदारसंघात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे इच्छुक असून त्यांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी आणि माजी आमदार दिनकर माने हे ही विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

चंद्रकांत खैरे, नेते शिवसेना
author img

By

Published : Sep 24, 2019, 5:28 PM IST

लातूर - सध्या युतीबाबत सकारात्मक चर्चा असली तरी हक्काच्या जागेवर शिवसेना दावा करीत आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले असून ऐनवेळी वेगळा निर्णय झाल्यास आम्हाला केवळ एका आदेशाची आवश्यकता असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. ते सोमवारी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हक्काच्या जागेवर शिवसेनेचाच दावा - चंद्रकांत खैरे

हे ही वाचा - शरद पवार ...तर लोकसभा लढवणार नाही -उदयनराजे झाले भावूक

राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सगळेच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अद्यापही अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील औसा आणि लातूर शहर हे परंपरागत मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यंदाही हे मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत म्हणून कार्यकर्त्यांचा रेटा आहे. या मतदारसंघात अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर झाले नसले तरी पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा - आज आर आर पाटील असते तर? राष्ट्रवादीला जाणवतेय आबांची उणीव

भाजप सेना युतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. औसा मतदारसंघात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे इच्छुक असून त्यांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी आणि माजी आमदार दिनकर माने हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. असे असतानाच चंद्रकांत खैरे यांनी हक्काच्या जागेवर आमचाच अधिकार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे युती होणार की नाही यावर बरेच काही अवलंबून आहे. शेवटी आमच्यासाठी पक्ष प्रमुखांचे आदेशच प्रमाण असल्याचेही खैरे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा - महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव

Intro:हक्काच्या जागेवर शिवसेनेचाच दावा ; युतीबाबत सकारात्मक मात्र, आम्ही आदेशाची वाट पाहतो : खैरे
लातूर : सध्या युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असली तरी हक्काच्या जागेवर शिवसेना दावा करीत आहे. सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले असून ऐन वेळी काही झाल्यास आम्हाला केवळ एका आदेशाची आवश्यकता असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते लातुरात दाखल झाले तेव्हा पत्रकारांशी बोलत होते.
Body:सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोमाने वाहू लागले2 आहे. अद्यापही अधिकृत नावाची घोषणा झाली नसली तरी अनेकजण शड्डू ठोकून मैदानात उतरलेले आहेत. मात्र, जिल्ह्यातील औसा आणि लातूर शहर हे परंपरागत शिवसेनेकडे होते.. आणि यंदाही राहावेत त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा रेठा सुरू आहे. अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर झाले नसले तरी पक्षातील इच्छुक कामाला लागले आहेत. युतीबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. औसा मतदार संघात भाजपकडून इच्छुक असलेले मुख्यमंत्री यांचे स्वीयहायक अभिमन्यू पवार यांनी तयारी सुरू केली आहे तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी आणि माजी आमदार दिनकर माने हे इच्छुक आहेत. असे असतानाच चंद्रकांत खैरे यांनी हक्काच्या जागेवर आमचाच अधिकार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ताणली जाणारी युती तुटणार की होणार यावर बरेच काही अवलंबून आहे. Conclusion:शेवटी आमच्यासाठी पक्ष प्रमुखांचे आदेशच प्रमाण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.