ETV Bharat / state

मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करु.. मात्र, मत एनडीएलाच द्या - गडकरी

लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. जो तो आश्वासनांची खैरात करीत मताचा जोगवा मागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर अतिशयोक्ती करीत मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करु, मात्र मत हे एनडीए सरकारला देण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

author img

By

Published : Apr 16, 2019, 12:01 PM IST

लातूर

लातूर - लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. जो तो आश्वासनांची खैरात करीत मताचा जोगवा मागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर अतिशयोक्ती करीत मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करु, मात्र मत हे एनडीए सरकारला देण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

लातूर

आतंकवाद नष्ट करायचा असेल... शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील...लातूर आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवायचा असेल...शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची असेल...एवढेच नाही तर मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणेही शक्य आहे मात्र, याकरिता एनडीएला मतदान करण्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भर दुपारी उन्हाच्या झळा सहन करीत उपस्थितांच्या कानावर एक ना अनेक आश्वासने पडत होती.

काँग्रेसच्या ६० वर्षांतील कारभारावर सवाल उपस्थित करीत गडकरी यांनी गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत आघाडी सरकारची सत्ता होती. शिवाय लातूरकडे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अशी पदेही होती. मात्र, पाण्याचा प्रश्न सुटला नाही हे दुर्दैव आहे. आता नदीजोड प्रकल्पातून जायकवाडी धरण भरले जाणार असून मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच काही ५ वर्षात होणार नाही तर आगामी काळात शेती व्यवसायाला घेऊन शेतकरी समृद्ध केला जाणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उदासीनतेमुळे लग्न झाले एकाचे आणि लेकरं सांभाळायची आम्ही अशी अवस्था झाली आहे. मात्र, देश समृद्ध आणि विकासात्मक हेच भाजपाचे धोरण आहे.

त्यामुळे जनतेची साथ आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मताचा जोगवा मागितला. मात्र, अवास्तव आश्वासने देऊन मतदारांचे मत परिवर्तीत करण्यासाठीचा आटापिटा स्पष्टपणे दिसून येत होता.

Intro:स्वप्नरंजन वक्तव्य करून गडकरींनी मागितला मतांचा जोगवा
लातूर : लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. जो तो अश्वसनांची खैरात करीत मताचा जोगवा मागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर अतिशीयोक्ती करीत मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू मात्र मत हे एनडीए सरकारला देण्याचे आव्हान केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आतंकवाद नष्ट करायचा असेल... शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील...लातूर आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवायचा असेल...शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची असेल...एवढेच नाही तर मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणेही शक्य आहे मात्र, याकरिता एनडीए ला मतदान करण्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भर दुपारी उन्हाच्या झळा सहन करीत उपस्थितांच्या कानावर एक ना अनेक आश्वासने पडत होती.

Body:काँग्रेसच्या 60 वर्षातील कारभारावर सवाल उपस्थित करीत गडकरी यांनी गेल्या 5 वर्षात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. ग्रामपंचायती पासून ते दिल्लीपर्यंत आघाडी सरकारची सत्ता होती शिवाय लातूरकडे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अशी पदेही होती मात्र, पाण्याचा प्रश्न सुटला नाही हे दुर्दैव आहे. आता नदी जोड प्रकल्पातून जायकवाडी धरण भरले जाणार असून मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच काही 5 वर्षात होणार नाही तर आगामी काळात शेती व्यवसायाला घेऊन शेतकरी समृद्ध केला जाणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उदासीनतेमुळे लग्न झाले एकाचे आणि लेकरं सांभाळायची आम्ही अशी अवस्था झाली आहे. मात्र, देश समृद्ध आणि विकासात्मक हेच भाजपाचे धोरण आहे.

Conclusion:त्यामुळे जनतेची साथ आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मताचा जोगवा मागितला. मात्र, अवास्तव आश्वासने देऊन मतदारांचे मत परिवर्तित करण्यासाठीचा आटापिटा स्पष्टपणे दिसून येत होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.