ETV Bharat / state

निलंगा तहसीलदाराच्या अंगावर धावून जाणाऱ्या 'त्या' पाचही जणांवर गुन्हा दाखल - निलंगा तहसीलदार मारहाण प्रकरण

लातूर जिल्ह्यातील हा असा प्रकारे कारवाई केलेला पहिलाच गुन्हा असल्यामुळे विलगीकरण कक्षातील नागरिक आणि त्यांच्याशी संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात गोंधळ घालणाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या, या पाच जणांवर कायदेशीर कारवाई झाल्याने अशा प्रकारांना आता आळा बसेल.

Tehsil Office Nilanga
तहसील कार्यालय निलंगा
author img

By

Published : Jul 18, 2020, 9:00 PM IST

निलंगा (लातूर) - निलंगा तालुक्यातील जाऊ येथील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी, आम्ही दिलेले तपासणीचे रिपोर्ट का येत नाहीत. तुम्ही वारंवार आमचे नमुने का घेता, असे म्हणून चक्क तहसीलदाराच्या अंगावर धाव घेतली होती. त्यामुळे तहसीलदारांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घातल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शुक्रवारी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जाऊ येथील वस्तीगृह प्रशासनाने विलगीकरणासाठी घेतले आहे. या विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सध्या येथे बाधित रुग्णांच्या संपर्कातील ५२ जण आहेत. या विलगीकरण कक्षाला निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास भेट दिली. तेथील मुस्तफा खुर्शीद लष्करे, आरिफ खुर्शीद पटेल, आतीक खाजा पटेल (रा.औराद शहाजानी) सय्यद शाकीब दुरानी, सय्यद सुभानी समदानी खान (रा. निलंगा) या पाच जणांनी आमचा तपासणीस पाठवलेला रिपोर्ट का येत नाही. तुम्ही वारंवार आमची तपासणीचे नमुने का घेता, म्हणून मारहाण करण्याच्या उद्देशाने तहसीलदार गणेश जाधव यांच्या अंगावर धावून गेले.

गणेश जाधव तहसीलदार निलंगा यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - 'कोरोनाची गंभीर लक्षणे आणि रुग्णाचा रक्तगट याचा संबंध नाही'

या सर्वांनी त्यांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. विलगीकरण कक्षात असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी शिवाय बाहेर येता येत नाही. तरीही कोणतीही परवानगी न घेता विलगीकरण कक्षाच्या बाहेर येऊन गोंधळ घातला. साथरोग आदेशाचे उल्लंघन करून कसलीही खबरदारी न बाळगता मानवी जीवितास धोका निर्माण करून जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे वर्तन करण्याचा प्रयत्न केला.

निलंगा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या संपर्कातील लोकांचीही संख्या वाढत आहे. निलंगा तालुक्यासाठी जाऊ येथील अनुसूचित जाती निवासी मुलीची वस्तीगृह व दापका येथील अनुसूचित जाती निवासी मुलीची वस्तीगृह या दोन ठिकाणी विलगीकरण कक्ष आणि कोविड कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यातील हा असा प्रकारे कारवाई केलेला पहिलाच गुन्हा असल्यामुळे विलगीकरण कक्षातील नागरिक आणि त्यांच्याशी संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात गोंधळ घालणाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या, या पाच जणांवर कायदेशीर कारवाई झाल्याने अशा प्रकारांना आता आळा बसेल.

हेही वाचा - टाळेबंदी विरोधात वकीलाची न्यायालयात धाव, सोमवारी जनहित याचिकेवर सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.