ETV Bharat / state

रेल्वेच्या क्वार्टर रुममध्ये चोरीचे सोयाबीन; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - लातूर सोयाबीन चोरी बातमी

शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरीला गेले अशा अनेक घटना घडल्या आहेत. पण, लातूरमध्ये चक्क माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून चोरीचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री मालवाहतूक गाड्या उड्डाण पुलावर आल्या की या वाहनधारकाबरोबर हुज्जत घालायची आणि मागच्या बाजूने सोयाबीन काढून घ्यायचे हा प्रकार सुरू होता. त्यामुळे व्यापाऱ्यांसह वाहनधारक हे त्रस्त होते. ही प्रकार मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) रात्री उघडकीस आला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोयाबीनचे पोते
सोयाबीनचे पोते
author img

By

Published : Dec 2, 2020, 6:47 PM IST

लातूर - येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन एमआयडीसी येथील ऑइल कंपनीत नेले जात आहे. दरम्यान, बार्शी रोडवरील उड्डाण पुलावर काही तरुण हे वाहनधारकाशी हुज्जत घालत असत व काहीजण मागच्या बाजूने सोयाबीनचे पोती काढून घेत होते. एवढेच नाही तर उड्डाण पुलाला लागून असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये सोयाबीनची साठवणूक केली जात होती. अखेर बुधवारी (दि. 2 डिसेंबर) पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आढावा घेतान प्रतिनिधी

मराठवड्यात सर्वात मोठी सोयाबीनची बाजारपेठ ही लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. दिवसाकाठी 30 ते 40 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन रात्री-अपरात्री एमआयडीसी येथील विविध ऑइल कंपनीत नेले जात होते. गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळे रात्रभर सोयाबीनची वाहतूक ही सुरूच होती. याचाच फायदा घेत काही तरुण बार्शी रोडवरील उड्डाणपुलावर वाहनाचा वेग मंदावला की वाहनचालकाशी हुज्जत घालत तर काहीजण मागच्या बाजूने सोयाबीन काढून घेत असत. त्यामुळे ऑइल कंपनीत वाहनाचे वजन हे कमी भरत होते. पण, यामध्ये नेमके काय होत आहे याचा अंदाज येत नव्हता.

मंगळवारी हा प्रकार आला निदर्शनास

मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) मध्यरात्री या पुलावर वाहांचालकाशी हुज्जत घालत असताना एका वाहनचालकाच्या निदर्शनास आले की ट्रकमधून सोयाबीनचे पोती काढले जात आहेत. मात्र, रात्री एकट्याने धाडस न करता ऑइल कंपनीतील सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला आणि सर्वकाही उघडकीस आले. याच पुलावर सोयाबीन काढून घेतले जात होते तर लगतच असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये ते साठवून ठेवले जात होते. दुसऱ्या दिवशी याच सोयाबीनची विक्री करून हे तरुण हजारो रुपये मिळवत होते. पण, मंगळवारी रात्री हा सर्व प्रकार निदर्शनास आला असून वाहेद शेख (वय 38 वर्षे) यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोन तासांमध्ये हजारोंची मिळकत

सोयाबीन घेऊन वाहन हे उड्डाणपुलावर येताच काही तरुण हे माझ्या गाडीला कट का मारला म्हणून वाहनचालकाशी हुज्जत घालत होते. तर दुसरीकडे काहीजण वाहनातून 10 ते 15 पोती सोयाबीन काढून खाली फेकत होते. एवढेच नाही तर उड्डाणपुलाला लागूनच असलेल्या एका खोलीत या सोयाबीनची साठवणूक केली जात होती. तर दुसऱ्या दिवशी याची विक्री करून हे तरुण 20 ते 25 हजार कमवत होते. मात्र, हा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय आरोपींना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

यामागे मोठे जाळे असण्याची शक्यता

या घटनेची माहिती वाहनचालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असता अवघ्या काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, आरोपींच्या दोन दुचाक्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. तब्बल दीड लाख रुपयांची दुचाकी आढळून आली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या या चोरीत केवळ हे तरुणच आहेत की यामागे मोठे जाळे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा - विम्याची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी पतीचा खून करणाऱ्या पत्नीला 9 वर्षानंतर अटक

हेही वाचा - 'मी पुन्हा येईन', असे वाक्य विचार करून वापरावी लागणार; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.