ETV Bharat / state

शरद पवारांबद्दल समाजमाध्यमांवर अक्षेपार्ह मजकूर; भाजप सभापतीविरोधात गुन्हा दाखल - Sharad Pethkar BJP corporator Nilanga Latur

निलंगा नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक आणि स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती शरद पेठकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ पोस्ट करताना शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरुन पेठकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sharad Pethkar BJP corporator Nilanga Latur
शरद पेठकर भाजप नगरसेवक निलंगा लातूर
author img

By

Published : Jul 1, 2020, 3:13 PM IST

निलंगा (लातूर) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दा टीका केली. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमठले होते. त्यानंतर आता निलंगा नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक आणि स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती शरद पेठकर यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ पोस्ट करताना शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरुन पेठकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंगा नगरपरिषदेतील स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती शरद पेठकरांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तक्रार दाखल...

हेही वाचा... विठ्ठला, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निलंगा शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी दिनांक २७ जुन रोजी निलंगा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. परंतु पोलीस निरिक्षक अनिल चोरमले यांनी गुन्हा दाखल न केल्याने शरद पवार विचार मंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस निलंगा यांच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांंच्याकडे सर्व पुराव्यानिशी निवेदन देत तक्रार दाखल केली. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करुन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार विचार मंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर यांनी केली होती. गुन्हा दाखल न केल्यास शहरात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थता बिघडू नये, यासाठी निलंगा पोलिसांनी धम्मानंद काळे यांच्या फिर्यादीवरून शरद पेठकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.