लातूर - अपघातानंतर वाहने पेटण्यांच्या घटनेत वाढ होत आहे. असाच एक प्रकार लातूर-नांदेड मार्गावरील भातखेडा गावाजवळ मंगळवारी सकाळी घडला आहे. दोन कारमध्ये झालेल्या अपघातात एक कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रणरणत्या उन्हात धावती वाहने पेटून होत असलेल्या दुर्घटनांमुळे चालकांमध्ये अस्वस्थता आहे. यापूर्वी बीड, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद येथे अपघातानंतर अशा घटना झाल्या आहेत. यातच आज सकाळी लातुर-नांदेड मार्गावर अपघातानंतर कारने पेट घेतला होता. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशी कारमधून बाहेर काढण्यात आले. वेळीच पेटत्या कारमधून बाहेर पडल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.