ETV Bharat / state

भाजपच्या विजयाने लातुरात जल्लोष; फिर एक बार मोदी सरकारचा जयघोष - latur

भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे हे जवळपास 2 लाख 90 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सायंकाळी 6 च्या दरम्यान विजय दृष्टीक्षेपात येताच शहरातील गांधी चौक, शिवाजी चौक, गंजगोलाई येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

भाजपच्या विजयाने लातुरात जल्लोष
author img

By

Published : May 24, 2019, 9:54 AM IST

लातुर - लातूरच्या इतिहासात सर्वाधिक मताने भाजपला मताधिक्य मिळाले आहे. विजय निश्चित होताच शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि मोदी सरकारचा जयघोष करण्यात आला. भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे हे जवळपास 2 लाख 90 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सुधाकर शृंगारे हे आघाडीवर होते ते अखेरच्या फेरीपर्यंत. सायंकाळी 6 च्या दरम्यान विजय दृष्टीक्षेपात येताच शहरातील गांधी चौक, शिवाजी चौक, गंजगोलाई येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 7 च्या दरम्यान भाजपचे उमेदवार हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले होते, त्यावेळीही कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र, सध्या सर्वसामान्य जनता दुष्काळाशी दोन हात करीत आहे. त्यामुळे विजयी मिरवणूक काढली जाणार नसल्याचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.

भाजपच्या विजयाने लातुरात जल्लोष

तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता पाहावयास मिळाली. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार तर सोडाच एजंटही उपस्थित नसल्याचे चित्र होते. ग्रामीण भागातून भाजपला अधिकचे मतदान मिळाले आहे. तर यंदा प्रथमच लातुर शहरातून भाजपला आघाडी मिळाली आहे. एकंदरीत सर्वच चित्र बदललेले असून याचे परिणाम आता विधनासभेवरही होणार आहेत हे नक्की.

Intro:भाजपच्या विजयाने लातुरात जल्लोष ; फिर एक बार मोदी सरकारचा जयघोष
लातुर : लातूरच्या इतिहासात सर्वाधिक मताने भाजपला मताधिक्य मिळाले आहे. विजय निश्चित होताच शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि मोदी सरकारचा जयघोष करण्यात आला.
Body:भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे हे जवळपास 2 लाख 90 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सुधाकर शृंगारे हे आघाडीवर होते ते अखेरच्या फेरीपर्यंत. सायंकाळी 6 च्या दरम्यान विजय दृष्टीक्षेपात येताच शहरातील गांधी चौक, शिवाजी चौक, गंजगोलाई येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 7 च्या दरम्यान भाजपचे उमेदवार हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले होते त्यावेळीही कार्यकर्त्यानी मोठा जल्लोष केला. मात्र, सध्या सर्वसामान्य जनता दुष्काळाशी दोन हात करीत आहे. त्यामुळे विजयी मिरवणूक काढली जाणार नसल्याचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता पहावयास मिळाली. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार तर सोडाच एजंटही उपस्थित नसल्याचे चित्र होते. ग्रामीण भागातुन भाजपला अधिकचे मतदान मिळाले आहे. तर यंदा प्रथमच लातुर शहरातून भाजपला आघाडी मिळाली आहे. एकंदरीत सर्वच चित्र बदलेले असून याचे परिणाम आता विधनासभेवरही होणार आहेत हे नक्की. Conclusion:भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून जागोजागी जल्लोष केला जात आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.