ETV Bharat / state

निलंग्यातील भिल्ल समाजाने दिली जात पंचायतीला मूठमाती, जिल्हाधिकाऱ्यांना दिले शपथपत्र - निलंगा

भिल्ल वस्तीवरील गोविंद गानंगुळे यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने बहिष्कृत केले होते. तसेच, त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे गानंगुळे कुटुंबाला वस्ती सोडावी लागली होती. गोविंद यांच्या पत्नी अंबिका यांनी त्रासाला कंटाळून दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Breaking News
author img

By

Published : Mar 27, 2019, 1:22 PM IST

लातूर - अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने निलंगा शहराजवळच्या भिल्ल वस्तीने जात पंचायतीला मूठमाती दिली आहे. या जात पंचायतीने वस्तीवरील गानंगुळे कुटुंबाला बहिष्कृत करुन त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे गानंगुळे कुटुंबाने अंनिसच्या माध्यमातून शासनाकडे धाव घेतली. यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. जात पंचायत बंद करत असल्याचे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

अंनिसचे कार्यकर्ते माधवे बावगे यांनी जात पंचायत बंद करण्यासाठी पुढाकार घेतला

भिल्ल वस्तीवरील गोविंद गानंगुळे यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने बहिष्कृत केले होते. तसेच, त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे गानंगुळे कुटुंबाला वस्ती सोडावी लागली होती. गोविंद यांच्या पत्नी अंबिका यांनी त्रासाला कंटाळून दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या गानंगुळे कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे धाव घेतली.

अंनिसचे कार्यकर्ते माधव बावगे यांनी जात पंचायतीच्या पंचांचे प्रबोधन केले. त्यामुळे ही जात पंचायत कायमची बंद करण्याचा निर्णय लक्ष्मण गंगाराम विभूते, दशरथ काशिनाथ विभूते या पंचांनी घेतला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मंगळवारी पंचायत बंद करत असल्याचे शपथपत्र पंचांकडून देण्यात आले. यापुढे जात पंचायत झाल्यास कारवाई केली जाणार असल्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, विकासाच्या कामाच्या बाबतीत पंचायत भरवू शकता असेही सांगितले.

Intro:अखेर जात-पंचायतची 'पंचायत' मिटली ; पीडित कुटुंबियांसह वस्तीवरील ग्रामस्थांना दिलासा
लातूर : निलंगा शहरानजीकच्या वस्तीवरील भिल्ल समाजात जात-पंचायतीने न्याय निवाडा केला जात होता. या प्रथेचे बळी ठरलेल्या गानंगुळे कुटुंबीयांनी आवाज उठविताच जिल्हा प्रशासन आणि अनिसच्या वतीने येथील पंचाचे प्रबोधन करून हि प्रथा बंद केली आहे. Body:मंगळवारी जात-पंचायत बंद केल्याचे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यापुढे जात-पंचायत झाली तर वस्तीच्या विकास कामांच्या अनुषंगाने घ्या अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत.
भिल्ल वस्तीवर सुरु असलेल्या या जात-पंचायतीच्या अनिष्ट प्रथेमुळे गोविंद गानंगुळे कुटुंबियांना बहिष्कृत करून ५० हजाराची मागणी करण्यात आली होती. मात्र, आर्थिक स्थिती हलाकीची असल्याने गोविंद गानंगुळे यांना वस्ती सोडावी लागली होती. शिवाय गोविंद यांच्या पत्नी अंबिका हिने दोन वेळा आत्महत्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, पंचाच्या त्रासाला कंटाळून जीवन संपिण्यापेक्षा त्यांनी लढण्याचा निर्धार केला आणि थेट अनिसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही या प्रथेला आळा घालण्याचे आदेश दिले अन्यथा कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले होते. दरम्यान कारवाईची टांगती तलवार आणि अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी वस्तीवर जाऊन या अनिष्ट प्रथेबाबत प्रबोधन केले होते. त्यामुळे १० दिवसातच येथी जात-पंचायत बंद करण्याचा निर्धार पंच लक्ष्मण गंगाराम विभूते, दशरथ काशीनाथ विभूते यांनी घेतला. याबाबत शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहून देऊन गानंगुळे कुटुंबीयांची माफी मागितली व त्यांना वस्तीवर राहण्यास परवानगी दिली आहे. शिवाय यापुढे अशी प्रथा सुरु राहणार नसल्याचेही पंचानी सांगितले आहे. Conclusion:जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पंचायत घ्यायची असेल तर विकास कामाच्या अनुषंगाने घेण्याचा सल्ला दिला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.