ETV Bharat / state

वर्षभरात लातूरला उजणीचे तर उदगीरला लिंबोटीचे पाणी पुरवण्याचा मानस- संजय बनसोडे

author img

By

Published : Jan 19, 2020, 1:50 PM IST

पालकमंत्री अमित देशमुख तसेच पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे हे अवघ्या काही कालावधीतच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्ष लातूरकर आणि उदगीरकारांच्या मागणीची पूर्तता होणार का हे पाहाणे महत्वाचे आहे.

latur
पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे

लातूर- ज्या पाणीप्रश्नावर विधानसभा निवडणुका ढवळून निघाल्या. आता तो पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान लोकप्रतिनिधी यांच्यासमोर आहे. त्यानुसार लातूरला उजणीचे तर उदगीरला लिंबोटीचे पाणी वर्षभरात पुरवठा करण्याचा मानस आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रधान सचिव यांच्याशी बैठकी झाल्या असल्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.

माहिती देताना पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे

पहिल्याच वेळी उदगीर मतदारसंघातून आमदार झालेले संजय बनसोडे यांच्यावर पाणी पुरवठा, भूकंप पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पद सोपविण्यात आले आहे. शहरासह उदगीर, अहमदपूर या मतदारसंघात पाणी प्रश्न कायम आहे. यंदा परतीच्या पावसाने लातूरकरांची तहान भागवली असली तरी भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायम राहणार आहे. सबंध विधानसभा निवडणूक याच मुद्द्यांच्या भोवती फिरत होती. आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी सबंध प्रचारात उजनीच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता. तर, सत्ता स्थापन होताच रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

आता महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून हे सरकार आश्वासनाची पूर्तता करणार का, याकडे लक्ष लागले आहे. पालकमंत्री अमित देशमुख तसेच पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे हे अवघ्या काही कालावधीतच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्ष लातूरकर आणि उदगीरकारांच्या मागणीची पूर्तता होणार का हे पाहाणे महत्वाचे आहे. शनिवारी बाळभागवान व शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार कार्येक्रमात ना. संजय बनसोडे यांनी पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी आ. बाबासाहेब पाटील तसेच स्वरातीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा सत्कार पार पडला. यावेळी माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, बाळासाहेब जाधव, डी. बी. लोहारे, भागवनसिंह बायस, बळीराम भिंगोले यांची उपस्थिती होती.

हेही वाचा- लातूर जिल्ह्यात हरभऱ्याचा विक्रमी पेरा; रब्बीची पेरणी लांबणीवर पडल्याचा परिणाम

Intro:लातूरला उजणीचे तर उदगीरला लिंबोटीचे पाणी, वर्षभरात अंमलबजावणी ; संजय बनसोडे
लातूर : ज्या पाणीप्रश्नावर विधानसभा निवडणुका ढवळून निघाल्या आता तो पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान लोकप्रतिनिधी यांच्यासमोर आहे. त्यानुसार लातूरला उजणीचे तर उदगीरला लिंबोटीचे पाणी वर्षभरात पुरवठा करण्याचा मानस असून यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रधान सचिव यांच्याशी बैठका झाला असल्याचे पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.

Body:पहिल्याच वेळी उदगीर मतदारसंघातून आमदार झालेले संजय बनसोडे यांच्यावर पाणी पुरवठा, भूकंप पुंनर्वसन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पद सोपविण्यात आले आहे. लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर या मतदारसंघात पाणी प्रश्न कायम आहे. यंदा परतीच्या पावसाने लातूरकरांची तहान भागवली असली तरी भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहणार आहे.संबंध विधानसभा निवडणुक याच मुद्द्यांच्या भोवती फिरत होती. आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी संबंध प्रचारात उजनीच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता. तर सत्ता स्थापन होताच रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आता महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून हे सरकार आश्वासनाची पूर्तता करणार याकडे लक्ष लागले आहे.पालकमंत्री अमित देशमुख तसेच पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे हे अवघ्या काही कालावधीतच हा प्रश्नमार्गी लावणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्ष लातूरकर आणि उदगीर कारांची मागणीची पूर्तता होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी बाळभागवान व शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ना. संजय बनसोडे यांनी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी आ. बाबासाहेब पाटील तसेच स्वराती चे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा सत्कार पार पडला.

Conclusion:यावेळी माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, बाळासाहेब जाधव, डी. बी. लोहारे, भागवनसिंह बायस, बळीराम भिंगोले यांची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.