ETV Bharat / state

दुष्काळाची दाहकता; आजचे संकट उद्याचे मरण... सांगा कशी जगवायची जितराब? - जनावरे

त्यामुळेच जनावराला किंमत किती मिळते यापेक्षा किती लवकर विकले जाईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. कारण शाश्वत चाराच नसल्याने घरी नेऊन तरी जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱयांसमोर कायम आहे. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.

दुष्काळाची दाहकता; आजचे संकट उद्याचे मरण
author img

By

Published : May 7, 2019, 7:00 PM IST

Updated : May 7, 2019, 9:57 PM IST

लातूर - दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम पशुधनावर होताना दिसत आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाही तालुक्यातील मुरुडच्या बाजारात जनावरांची आवक वाढतच आहे. त्यामुळे जनावरांच्या किमती निम्म्याने घटल्या असतानाही चारा आणि पाण्याअभावी मिळेल ते पैसे घेऊन दावणीचे जनावर व्यापाऱ्याच्या पदरी घालण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. पोटच्या गोळ्याप्रमाणे जनावराचा सांभाळ करूनही दुष्काळाचे नैसर्गिक संकट आणि प्रशासनाची निगरगट्ट भूमिका यामुळे शेतकऱ्यांकडे पर्यायच उरला नसल्याचे चित्र मंगळवारच्या आठवडी बाजारात पाहायला मिळाले.

दुष्काळाची दाहकता; आजचे संकट उद्याचे मरण... सांगा कशी जगवायची जितराब?

मुरुड येथील जनावरांच्या आठवडी बाजारात जिल्ह्यासह मराठवाड्यातून पशुधन खरेदी-विर्क्रीसाठी येत असतात. दुष्काळाची दाहकता वाढल्यापासून जनावरांची संख्याही वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत दर कमी झाले असून शेतकऱ्यांना ८० हजाराची बैलाची जोड केवळ ४० हजारात द्यावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाई आणि कोणत्याच प्रकारचा चारा नसल्याने हाच अखेरचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. शिवाय बाजारातून आल्या पावली परत जाणेही न परवडण्यासारखे असल्याने मिळेल त्या दरात विक्री केली जात आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही मशागत कशाच्या जीवावर करायची याची परवा न करता आजचे संकट उद्याचे मरण होऊ नये म्हणून शेतकरी आपली दावण रिकामी करण्याच्या मागे आहे.

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे चारा उपलब्ध असल्याने चारा छावणीची गरजच नसल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ पाहणीचे आदेश देऊनही कोणताच प्रतिनिधी आमच्या बांधावर पोहचला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गावागावात असलेला दुष्काळ केवळ प्रशासनाच्या कागदावर पोहोचला नसल्याने सर्व काही अलबेल असल्याचा अंदाज बांधला जात आहे. शेजारच्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडोने चारा छावण्या सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात केवळ एक चारा छावणी तेही जैन संघटनेने सुरू केलेली आहे. प्रत्यक्षात स्थिती धक्कादायक असून पडद्यामागचे चित्र लपवून ठेवण्यातच जिल्हा प्रशासन समाधान मानत आहे.

Intro:बाजारात बेभाव अन दारात चाऱ्याचा वाणवा... सांगा कशी जगवायची जितराफ..?
लातूर : दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम पशुधनावर होत असताना दिसत आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाही तालुक्यातील मुरुडच्या बाजारात जनावरांची आवक वाढतच आहे. त्यामुळे जनावरांच्या किमती निम्म्याने घटल्या असतानाही चारा आणि पाण्याअभावी मिळेल ते पैसे घेऊन दावणीचे जनावर व्यापाऱ्याच्या पदरी घालण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. पोटच्या गोळ्याप्रमाणे जनावराचा सांभाळ करूनही दुष्काळाचे नैसर्गिक संकट आणि प्रशासनाची निगरगट्ट भूमिका यामुळे शेतकऱ्यांकडे पर्यायच उरला नसल्याचे चित्र मंगळवारच्या आठवडी बाजारात पाहवयास मिळाले.

Body:मुरुड येथील जनावराच्या आठवडी बाजारात जिल्ह्यासह मराठवाड्यातून पशुधन दाखल होते. दुष्काळाची दाहकता वाढल्यापासून जनावरांची संख्याही वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत दर कमी झाले असून शेतकऱ्यांना 80 हजाराची बैलाची जोड केवळ 40 हजारात द्यावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाई आणि कोणत्याच प्रकारचा चारा नसल्याने हाच अखेरचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. शिवाय बाजारातून आल्या पावली परत जाणेही न परवडण्यासारखे असल्याने मिळेल त्या दरात विक्री केली जात आहे. खरीप हंगाम तोंडवर आला असतानाही मशागत कशाच्या जीवावर करायची याची परवा न करता आजचे संकट उद्याचे मरण होऊ नये म्हणून शेतकरी आपली दावण रिकामी करण्याच्या मागे आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे चारा उपलब्ध असल्याने चारा छावणीची गरजच नसल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ पाहणीचे आदेश देऊनही कोणताच प्रतिनिधी आमच्या बांधावर पोहचला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गावागावात असलेला दुष्काळ केवळ प्रशासनाच्या कागदावर पोहचला नसल्याने सर्व काही आलबेल असल्याचा अंदाज बांधला जात आहे. शेजारच्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडोने चारा छावण्या सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात केवळ 1 चारा छावणी ते ही जैन संघटनेने सुरू केलेली आहे.प्रत्यक्षात स्थिती धक्कादायक असून पडद्यामागचे चित्र लपवून ठेवण्यातच जिल्हा प्रशासन समाधान मानत आहे.

Conclusion:त्यामुळेच जनावराला किंमत किती मिळते यापेक्षा किती लवकर विकले जाईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण शाश्वत चारच नसल्याने घरी नेऊन तरी जनावरे जगवायची कशी असा सवाल कायम आहे.
Last Updated : May 7, 2019, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.