लातूर - हसेगाव येथील सेवालयातील १६ एड्सग्रस्त मुलांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. ढोल ताशाच्या गजरात सर्व मुले मतदान केंद्रावर पोहोचली. मतदान करुन आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया सर्व मुलांनी व्यक्त केली.
हसेगाव येथे प्रा. रवी बापट यांनी सेवालयाची स्थापना केली आहे. गेल्या १२ वर्षांपासून ते एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करतात. समाजाकडून दुर्लक्षित केलेल्या या मुलांचा सेवालय हे आधार आहे. यातील १२ मुलांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रावर जाताना या मुलांनी ढोलताशाच्या गजरात आनंद साजरा केला. सेवालयाचे संस्थापक रवी बापट हेही त्यांच्यासोबत होते. मतदान केल्यावर आनंद झाल्याची भावना मुलांनी व्यक्त केली आहे.