ETV Bharat / state

अहमदपूर मतदारसंघ : अपक्षांच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी?

author img

By

Published : Aug 28, 2019, 2:27 PM IST

Updated : Aug 28, 2019, 9:50 PM IST

गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विनायकराव पाटलांनी पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे तगडे आव्हान भाजपसमोर असणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही यंदा निवडणुकीत उडी घेतली आहे. तर काँग्रेसकडून डॉ. गणेश कदम, सिराज जहांगिरदार मैदानात असल्यामुळे निवडणूक एकदम चुरशीची होणार आहे.

अहमदपूर मतदारसंघ

लातूर - कोणत्याही उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी न देणारा मतदार म्हणून अहमदपूर-चाकूर मतदारसंघाची ओळख आहे. अपक्षांचा बालेकिल्ला अशी अहमदपूर या मतदारसंघाची ओळख निर्माण होत आहे. मतदारांनी येथे कोणत्याही पक्षाला विचारात न घेता अपक्ष उमेदवारानांच पसंती दिली आहे. गेल्या 3 टर्मपासून अपक्ष उमेदवारांनीच या मतदारसंघातून आपले नशीब आजमावले आहे. तर सध्या अहमदपूरचे आमदार असणारे विनायकराव पाटील हेच भाजपमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

अहमदपूर मतदारसंघ : अपक्षांच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी?

गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विनायकराव पाटलांनी पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे तगडे आव्हान भाजपसमोर असणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही यंदा निवडणुकीत उडी घेतली आहे. तर काँग्रेसकडून डॉ. गणेश कदम, सिराज जहांगिरदार मैदानात असल्यामुळे निवडणूक एकदम चुरशीची होणार आहे.

अहमदपूर मतदारसंघात चाकूर तालुक्याचाही समावेश आहे. कायम सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याची येथील नागरिकांची मानसिकता असल्याचे इतिहासावरून दिसून येते. 2004 पासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने वर्चस्व अबाधित ठेवले आहे. मात्र, 2014 नंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. 2014 मध्ये अपक्ष निवडून आलेले विनायकराव पाटील यांनी कमळ हातात घेतले आहे. त्यामुळे आपणच भाजपचा उमेदवार असल्याचा दावा ते करत आहेत. तर, गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे सांगत भाजप प्रवक्ते गणेश हाके व अयोध्याताई केंद्रे यांच्यासह दिलीपराव देखमुख यांनी देखील उमेदवरीबाबत इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाला तिकीट मिळणार? यावर सर्व गणितं अवलंबून आहेत.

तर पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीकडूनही मुलाखत दिली असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पक्ष आतापर्यंत प्रमुख राहिले आहेत. मात्र, यावेळी वंचित बहुजन आघाडीनेही निवडणूकीत उडी घेतल्याने तिकीटवरून नाराज झालेले भाजप कार्यकर्ते वंचित आघाडीकडे जाऊ शकतात.

राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाबासाहेब पाटील आणि सोमेश्वर कदम यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसचे प्रभुत्व कमी आहे. या मतदारसंघात मराठा, मुस्लिम, लिंगायत, रेड्डी, दलित अशा अठरा पगड जातींचा समावेश असुन मागील इतिहास पाहता मुस्लिम व लिंगायत समाज हा निर्णायक ठरतो. ही मते ज्या पारड्यात जातील त्याचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे येत्या निवडणुकीत अहमदपूरची जनता कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी नाराज होणाऱ्या इच्छुकाची मनधरणी करण्याचे भाजपसमोर आव्हान असणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या गळाला कोणता उमेदवार लागतो यावरही येथील विधानसभेचा निकाल अवलंबून आहे. तसेच बेरोजगारी, शेती विषयक समस्या, ग्रामीण रस्ते, शिक्षण यासारखे प्रश्न आजही कायम आहेत. त्यामुळे यंदा बदललेल्या राजकीय समीकरणामुळे येथील मतदार पक्ष पाहून मतदान करणार की उमेदवार ? हा प्रश्न कायम आहे.

अहमदपूरचे आतापर्यंतचे आमदार -

  • 1967 ते 1980 - भाई किशनराव देशमुख ( शेकाप )
  • 1985 - रामचंद्रराव पाटील अंधोरीकर ( काँग्रेस)
  • 1990 - बाळासाहेब जाधव (काँग्रेस)
  • 1995 - भगवानराव नागरगोजे ( भाजप )
  • 1999 - विनायकराव पाटील ( अपक्ष )
  • 2004 - बब्रुवान खंदाडे ( भाजप )
  • 2009 - बाबासाहेब पाटील ( अपक्ष )
  • 2014 - विनायकराव पाटील ( अपक्ष)

Intro:Body:

Content:

Intro:बाईट : संभाजी पाटील निलंगेकर (पालकमंत्री)

विजय स्वामी ( राजकीय विश्लेषक)

गणेश हाके ( भाजपा प्रवक्ते )

आ. विनायक पाटील (आमदार)

अपक्ष उमेदवाराची परंपरा अहमदपूरकर कायम ठेवतात की पक्षाला पसंती देतात

लातूर : अहमदपूर- चाकूर मतदारांचे वेगळेपण राहिले आहे की येथील मतदारांनी एकाच उमेदवाराला सलग दोन वेळा कधीच संधी दिली नाही. तर पक्षाला विचारात न घेता अपक्ष उमेदवारालाच पसंती दिली आहे. गेल्या तीन टर्मपासून अपक्ष उमेदवाराने नशीब आजमीवले आहे. 2014 साली अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. विनायकराव पाटील हेच भाजपात गेल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली असल्याने येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे अहमदपूरकर यावेळीही उमेदवाराला आणि तेही अपक्ष अशा उमेदवारालाच पसंती देणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लातुर शहर पाठोपाठ या मतदार संघात निवडणूक रंगात होणार हे नक्की.

Body:अहमदपूर मतदार संघात चाकूर तालुक्याचाही समावेश आहे. कायम सत्ताधाऱ्याच्या विरोधात जाण्याची येथील नागरिकांची मानसिकता दिसून येते. 2004 पासून या मतदार संघात अपक्ष उमेदवाराने वर्चस्व अबाधित ठेवले आहे. मात्र, 2014 नंतर राजकीय समीकरणे बदली असून निवडून आलेले आ. विनायकराव पाटील यांनी देखील भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपकडून आपणच उमेदवार असल्याचा दावा ते करीत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे सांगत भाजपा प्रवक्ते गणेश हाके व अयोध्याताई केंद्रे यांच्यासह दिलीपराव देखमुख यांनीदेखील उमेदवरीबाबत इच्छा दर्शीवली आहे. त्यामुळे भाजपकडून तिकीट कुणाला मिळते आणि नाराज उमेदवार काय निर्णय घेतात यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. तर पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखत दिली असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. या मतदार संघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष राहिले आहेत. यावेळी मात्र, वंचित बहुजन आघाडीने उडी घेतल्याने तिकीटवरून नाराज झालेल्या भाजपा कार्यकर्त्याने वंचितचा मार्ग निवडला तर मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पत्यावर पडणार अशी चर्चा जोरात रंगू लागली आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाबासाहेब पाटील आणि सोमेश्वर कदम यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसचे प्रभूत्व कमी आहे. बेरोजगारी, शेती विषयक समस्या, ग्रामीण रस्ते, शिक्षण यासारखे प्रश्न आजही कायम आहेत. या मतदार संघात लातुर शहर प्रमाणेच मुस्लिम, दलित समाजाची मते लक्षणीय आहेत. मात्र, कोणताच समाज हा एकाच पक्षाच्या मागे राहिला नाही. उमेदवाराला पाहूनच मतदारांनी कौल दिला आहे. यंदा बदललेल्या राजकीय समिकरणामुळे येथील मतदार पक्ष पाहून मतदान करणार की उमेदवार हा प्रश्न कायम आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी नाराज होणाऱ्या इच्छुकाची मनधरणी करण्याचे आव्हान राहणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या गळाला कोणता उमेदवार लागतो यावरही येथील विधानसभेचा निकाल अवलंबून आहे.

Conclusion:जिल्ह्यात लातूर पाठोपाठ अहमदपूर मतदार संघात काय होणार याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपासाठी पोषक असलेल्या या मतदार संघात पक्षाला अंतर्गत मतभेदाचा फटका बसणार आणि त्याचा लाभ कुणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.