ETV Bharat / state

Actor Ritesh And Genelias Company Probed : अभिनेता रितेश-जेनेलियाच्या कंपनीची होणार चौकशी; सहकार मंत्र्यांनी दिले आदेश

अभिनेता रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख (Actor Ritesh and Genelias company probed) यांच्या 'मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड' (Desh Agro Pvt Ltd) या कंपनीला शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड (Latur MIDC plot sale case) दिला. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या सहकार मंत्री अतुल सावे (Co operation Minister Atul Save) यांनी दिल्याचे पत्र लातूर भाजपाने जारी केले आहे. latest news from Latur, Actor Ritesh and Genelias company dispute

Actor Ritesh And Genelias
अभिनेता रितेश-जेनेलिया
author img

By

Published : Nov 28, 2022, 12:49 PM IST

लातूर : अभिनेता रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख (Actor Ritesh and Genelias company probed) यांच्या 'मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड' (Desh Agro Pvt Ltd) या कंपनीला शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड (Latur MIDC plot sale case) दिला. शिवाय लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंपनीला दोन टप्प्यात एकूण 116 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप लातूर भाजपने (BJP alleges Ritesh Deshmukh company) केला होता. या कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या सहकार मंत्री अतुल सावे (Co operation Minister Atul Save) यांनी दिल्याचे पत्र लातूर भाजपाने जारी केले आहे. latest news from Latur, Actor Ritesh and Genelias company dispute

भूखंड गहाण ठेवून कंपनीने कर्ज घेतले : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मे.देश ॲग्रो प्रा.लि. या कंपनीला पहिल्यांदा 61 कोटी रुपयांचे कर्ज दिले. ज्यावेळी हे कर्ज दिले तेव्हा कंपनीला शासनाकडून लातूरच्या एमआयडीसीतील भूखंड मिळाला होता. तो भूखंड गहाण ठेवून कंपनीने 61 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकेकडून घेतले होते. त्यानंतर रितेश देशमुख यांचे बंधू लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाले. तेव्हा कंपनीला मिळालेला एमआयडीसीतील तोच भूखंड पुन्हा गहाण ठेवून 55 कोटी रुपयाचे कर्ज मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले. असे एकूण दोन टप्प्यात 116 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकेने कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप लातूर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे व शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲड.प्रदीप मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

अभिनेता रितेश व जेनेलिया यांच्या कंपनीच्या चौकशीची मागणी

सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे रीतसर तक्रार: या कर्ज प्रकरणी भाजपकडून शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेत सहकार मंत्र्यांनी सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अभिनेता रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व आ.धिरज देशमुख चेअरमन असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जबाबदार अधिकारी यांच्यावर दोष निश्चित करून पुढील काळात कठोर कारवाई होणार असल्याचे लातूर भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲड .प्रदीप मोरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.