ETV Bharat / state

धक्कादायक! चारचाकीने २२ किमीपर्यंत नेले फरफटत; व्हिडिओ व्हायरल - रेणापूर

ही चारचाकी अंबाजोगाईहून लातूरला जात होती. निवाडा फाट्यापासून लातूरपर्यंत चारचाकीने मृतदेहाला फरफटत नेले.

पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 23, 2019, 8:31 PM IST

लातूर - एका व्यक्तीला धडक देऊन त्याला २२ किमीपर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार रेणापूर तालुक्यातील निवाडा येथे समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. धडक दिल्यानंतर मारहाण होण्याच्या भीतीने चालकाने पळ काढल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस ठाणे व्हीडिओ

पोलीस ठाणे व्हीडिओ

निवाडा फाट्याजवळ लातूरकडे जाणाऱ्या चारचाकीने (क्र. एम. एच. ०४ ईडी ५२५२) एका व्यक्तीला धडक दिली. या धडकेनंतर ही व्यक्ती चारचाकीच्या खाली आली. पण, चालकाने गाडी न थांबवता ती चालूच ठेवली. तब्बल २२ किमीपर्यंत त्याने गाडी चालवत नेली. यावेळी मृतदेह गाडीच्या खालच्या भागाला लटकलेला होता.

लातूर शहरातील औसा रस्त्यावरील एका रुग्णालयाजवळ हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मृताचे नाव अश्रुबा सिद्धराम मोरे असे असून, ते पोहरेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. ही चारचाकी अंबाजोगाई येथील असून, ती अंबाजोगाईहून लातूरला जात होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश शिंगणकर करत आहेत.

Intro:...अगोदर धडक पुन्हा जीपने मृतदेह नेला २२ किलोमीटर फरफटत...विडिओ व्हायरल
लातूर - अपघात होताच घटना ठिकाणाहून पळ काढण्याचा मानस वाहन चालकाचा असतो. असाच प्रकार गुरूवारी पहाटे रेणापूर तालुक्यातील निवाडा फटा येथे झाला होता. जीप चालकाने एकाला जोराची धडक दिली आणि वाहनासह पळ काढताना धडक दिलेला मृतदेह हा जीपच्या खालच्या बाजूस अडकला. रेणापूर येथून लातूरकडे मार्गस्थ होत असलेल्या जीपने तब्बल २२ किलोमीटर तो मृतदेह फरफटत आणला. इतर वाहनधारक जीप चालकास सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, झालेल्या दुर्घटनेतून सुटका करण्यासाठी जीप चालक अधिकच वेगाने मार्गस्थ होत होता.Body:त्याचे झाले असे, रेणापूर तलुक्यातील निवाडा फाट्याजवळ लातूरकडे मार्गस्थ होत असलेल्या जीपने चालत असलेल्या इसमास जोराची धडक दिली होती. या घटनेशी आपला काही सबंध नसल्याच्या उद्देशाने जीपचालक पळ काढत होता. परंतू तो मृतदेह जीपच्या खालच्या बाजूस अडकलेला मृतदेह पिछा सोडत नव्हता. अखेर लातूर शहरातील औसा रोडवरील एका हॉस्पिटलजवळ त्याचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला. अंबाजोगाईहून ही जीप (एम.एच.०४ ईडी ५२५२) लातूरकडे मार्गस्थ होत होती. त्यामुळे मूळचे पोहरेगाव येथील अश्रुबा सिद्धराम मोरे यांचा दुर्देवी मृत्यू तर झालाच शिवाय यानंतर २२ किलोमिटर फरफट झाली ती वेगळीच. यानंतर शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून रेणापूूर पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.Conclusion:सदरील जीपची पासिंग मुंबईची असली तरी मूळ जीपमालक हा अंबाजोगाई येथील असल्याचे बोलले जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिनेश शिंगणकर हे अधिक तपास करीत आहेत. चालकाच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.