ETV Bharat / state

केवळ १०० रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळयात - police

रेशनकार्डवर ऑनलाईनद्वारे पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी तक्रारदार कार्यालयात आला असता साळूंखे याने १०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. पालेपाड यांनीही त्यास पृष्टी देत ५० रुपये साळुंखेकडे जमा करायला सांगितले होते.

शिवाजीनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : May 15, 2019, 3:08 AM IST

लातूर - तहसील कार्यालयात केवळ १०० रुपयांची लाच घेताना नायाब तहसीलदारला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिवाजी मारुती पालेपाड असे त्या लाचखोर तहसीलदाराचे नाव असून या प्रकरणी तहसीलदारासोबतच संगणक ऑपरेटरवरही शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगर पोलीस ठाणे

लातूर येथील तहसील कार्यालयात शिवाजी पालेपाड हे नायाब तहसीलदार तर साळुंके हा संगणक ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. रेशनकार्डवर ऑनलाईनद्वारे पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी तक्रारदार कार्यालयात आला असता साळूंखे याने १०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. पालेपाड यांनीही त्यास पृष्टी देत ५० रुपये साळुंखेकडे जमा करायला सांगितले होते. तक्रादाराने या प्रकरणाची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ आणि १० मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचत साळुंखेला रंगेहात पकडले. केवळ १०० रुपायांसाठी नायब तहसीलदार व ऑपरेटर यांनी केलेल्या कृत्याची चर्चा मात्र तहसील कार्यालय परिसरात रंगली होती. या प्रकरणी तहसीलदार पालेपाड आणि संगणक ऑपरेटर साळुंके यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:100 रुपयांच्या लाचेसाठी नायब तहसीलदारसह संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळयात
लातूर : 100 रुपयांची लाच आणि ते ही दोघांमध्ये हा प्रकार घडला आहे लातूरच्या तहसील कार्यालयात. ऑनलाईन रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नायब तहसीलदारच्या माध्यमातून संगणक ऑपरेटरने ही लाच मागितल्या प्रकरणी ऑपरेटरसह नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
Body:येथील तहसील कार्यालयात अंकुश साळुंके हा संगणक ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. तर नायब तहसीलदार म्हणून शिवाजी मारुती पालेपाड हे कर्तव्य बजावत होते. पत्नीचे नाव ऑनलाईनद्वारे रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करण्याची मागणी तक्रादाराने केली होती. मात्र, याकरिता आकाश साळुंके याने 100 रुपयांची मागणी केली तर नायब तहसीलदार पालेपाड यांनी त्यास पुष्टी दिली होती. याप्रकरणी 9 आणि 10 मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला होता. त्या दरम्यान, आकाश याने 100 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तर नायब तहसीलदार पालेपाड यांनीही नाव नमूद करून घेण्यासाठी 50 रुपये ऑपरेटर आकाशाकडे देण्याचे सांगितले होते. मात्र, कार्यालय बंद ठेऊन लाचेची मागणी करणाऱ्या आकाश याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. केवळ 100 रुपायांसाठी नायब तहसीलदार व ऑपरेटर यांनी केलेल्या कृत्याची चर्चा मात्र तहसील कार्यालय परिसरात रंगली होती. याप्रकरणी शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Conclusion:पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे, पो.नी वर्षा दंडीमे, पो. नी कुमार दराडे, पो. हे. देशमुख, डांगे यांनी ही कारवाई केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.