ETV Bharat / state

निलंग्यात 6 नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यातील 5 तालुक्यात कोरोनाचा संसर्ग - latur corona patient

मुंबई-पुण्याहून गावाकडे परतणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यातील लातूर, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा या तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

लातूर
लातूर
author img

By

Published : May 19, 2020, 4:17 PM IST

निलंगा (लातूर) - जिल्ह्यात प्रत्येक दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी 6 रुग्णांची भर पडल्यानंतर सोमवारी निलंगा तालुक्यातील कोराळे एकाच गावात कोरोनाचे 6 रुग्ण आढळले.

मुंबई-पुण्याहून गावाकडे परतणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यातील लातूर, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा या तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी जिल्ह्यातून 23 नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यापैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे हे सहाही रुग्ण एकाच गावातील आहे. ते मुंबईहून परतले होते. त्यांचे रविवारी नमुने घेण्यात आले होते.

हेही वाचा - खाकीतली माणुसकी; कॅन्सरग्रस्ताचे साहित्य घेऊन जाण्यास पोलिसाची मदत.. रुग्णाची सुखरूप रवानगी

या सर्व रुग्णांना निलंगा येथील संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 55वर पोहचली आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला तर 30 जण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर इतर 24 जणांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.