ETV Bharat / state

कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली - कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस

विविध मागण्यासाठी लातूरच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे.

5 days of agitation of students in Agricultural College in Latur
कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:09 PM IST

लातूर - कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाचा पाचवा दिवस असूनही विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाहीत. एकीकडे उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे महाविद्यालय प्रशासनाच्या बैठका सुरु आहेत. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही.

कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणारे लातूर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी मागील ५ दिवसांपासून कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाला बसले आहेत. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांच्या विरोधात मुले आक्रमक झाली आहेत. प्राचार्यांवर तत्काळ कारवाई करावी, ही मुख्य मागणी विद्यार्थ्यांची आहे. आज परभणी येथील कुलसचिव रणजित पाटील आणि संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांच्यासमोरही विद्यार्थी आक्रमक झाले होते. विद्यार्थ्यांनी रडत त्यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. मात्र, त्यावर ठोस करवाईबद्दल प्रशासनाकडून उत्तर मिळाले नाही.

मागील ५ दिवसापासून विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बसले आहेत. यातील ३ विद्यार्थ्यांना चक्कर आल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कुलसचिव महाविद्यालयात असताना आता काय निर्णय होणार हे पाहावे लागणार आहे.

Intro:बाईट : कुलसचिव रणजित पाटील

आंदोलनाचा ५ वा दिवस : विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली ; प्रशासनाच्या बैठकावर बैठका
लातूर : येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे आंदोलन हे सुरूच असून आता विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत आहे. तर दुसरीकडे कुलगुरू नंतर आज कुलसचिव रणजित पाटील व संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी विदयार्थ्यांशी चर्चा केली मात्र, तोडगा निघाला नाही. त्यामुळे एकीकडे आंदोलन सुरूच आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या बैठका सुरू आहेत.
Body:वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणारे लातूर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी मागील पाच दिवसापासून कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या आंदोलनाला बसले आहेत. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांच्या विरोधात मुले आक्रमक झाली आहेत. प्राचार्य वर तात्काळ कारवाई करावी ही मुख्य मागणी विद्यार्थ्यांची आहे.वआज परभणी येथील कुलसचिव रणजित पाटील आणि संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्या समोर ही विद्यार्थी आक्रमक झाले होते. विद्यार्थिनी रडत तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. मात्र त्यावर ठोस करवाईबद्दल उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही. मागील पाच दिवसापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार समोर बसलेले आहेत. यातील तीन विद्यार्थीना चक्कर आल्याने त्या कोसळल्या होत्या. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. Conclusion:त्यामुळे कुलसचिव महाविद्यालयात असताना आता काय निर्णय होणार हे पाहावे लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.