ETV Bharat / state

लातुरात 12 तासात 3 खून, औसामध्ये दोन तर उदगीरमध्ये एक - लातूर गुन्हे बातमी

उदगीर तालुक्यातील डांगेवाडीत धारदार शस्त्राने एकाचा खून करण्यात आला आहे. पाणी भरण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. तर चांद्रलोक ढाब्यावर वेटरने सहकाऱ्याचा खून केला आहे. तर औसा तालुक्यातील हिप्परगा येथे चुलत भावाचा खून करण्यात आला आहे.

Latur
लातुरात 12 तासात 3 खून
author img

By

Published : Mar 11, 2020, 3:13 PM IST

लातूर - शहरात 12 तासात 3 खून झाल्याचे समोर आले आहे. उदगीरमध्ये 1 तर औसात 2 खून झाले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून दोन्ही घटनांमध्ये क्षुल्लक कारणामुळे खून झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

औसा तालुक्यातील हिप्परगा येथे गोपाळ नरहरी कांबळे व उत्तम दशरथ कांबळे या चुलत भावांमध्ये सकाळी साडेआठच्या वाद झाला होता. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले आणि या हाणामारीतच गोपाळ नरहरी कांबळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भादा पोलिसांनी आरोपी उत्तम दशरथ कांबळे यास अटक केली आहे.

लातुरात 12 तासात 3 खून

हेही वाचा - विजेच्या धक्क्याने 18 मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू, एक लाखाचे नुकसान

औसा-लातूर रस्त्यावरील चांद्रलोक ढाब्यावर वेटरने सहकाऱ्याचा खून केला आहे. शहरापासून काही अंतरावरील चंद्रलोक ढाब्यावर भूजंग बाळाप्पा सोनवते (वय - 48 रा. हसलगण) आणि सूरज अंबादास जगताप (वय - 17 रा. जावळी) हे दोघे वेटर म्हणून काम करत होते. या दोघांमध्ये काल रात्री क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. रात्री दोघेही ढाबा बंद करुन झोपले असताना भांडणाचा राग मनात सूरजने भूजंग सोनवते यास मारहाण केली. यात घटनास्थळीच भूजंग सोनवते यांचा मृत्यू झाला आहे.

उदगीर तालुक्यातील डांगेवाडीत धारदार शस्त्राने एकाचा खून करण्यात आला आहे. पाणी भरण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत वाढवना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम पुंड, असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

डांगेवाडी येथील तुकाराम पुंड हे पाणी भरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अझर डांगे याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. भर रस्त्यावर ही घटना घडली असून नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, छातीवर वार झाल्याने तुकाराम पुंड यांचा जागीच मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तीवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे हे करत आहेत.

हेही वाचा - चार हजारांची लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.