ETV Bharat / state

दु:खद! कोरोनाने नव्हे तर, उद्भवलेल्या परस्थितीमुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

author img

By

Published : Apr 21, 2020, 7:47 AM IST

Updated : Apr 21, 2020, 11:21 AM IST

रविवारी रात्री साक्षीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमुळे वाहनधारक लातूर येण्यास काहितरी कारण सांगून जो-तो टाळटाळ करू लागला. दरम्यान, बाहेरगावी असलेल्या सरपंच मारुती कांबळे यांनी वाहनाची सोय केली आणि साक्षीला घेऊन घरातील सर्वजण लातूरकडे निघाले. परंतू, नियतिला हे मान्य नव्हते शासकीय रुग्णालय चार किमी असताना साक्षीचा मृत्यू झाला.

दु:खद! कोरोनाने नव्हे तर, उद्भवलेल्या परस्थितीमुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
दु:खद! कोरोनाने नव्हे तर, उद्भवलेल्या परस्थितीमुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

लातूर - सद्यस्थितीला लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संचारबंदी कायम आहे. याच परस्थितीमुळे चाकूर तालुक्यातील नांदगावातील एका १३ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला आहे. थॅलेसेमिया या आजाराशी झुंज देत असणाऱ्या साक्षीला उपचारासाठी लातूरला दाखल होण्यासाठी वाहनच मिळाले नसल्याने ही दुर्घटना घडली.

कोरोनाने नव्हे तर, उद्भवलेल्या परस्थितीमुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

घरात आठराविश्व दारिद्र्य असतानाही कांबळे दांम्पत्य पडेल ते काम करून कुटूंबाचा गाडा हाकत आहे. दुर्देव म्हणजे मुलगा प्रतिक आणि मुलगी साक्षी या दोघांनाही थॅलेसेमिया हा आजार जडलेला आहे. त्यामुळे महिन्याकाठी या दोघांनाही रक्त चढवावे लागत होते. यातच काही वर्षापूर्वी प्रतिकच्या ऑपरेशनसाठी मोठा खर्च या कुटूंबीयांना करावा लागला होता. असे असतनाही परिश्रम आणि काटकसर करुन कांबळे कुटूंबियांचे सर्व काही सुरळीत होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि कमावते नवरा-बायको घरातच बसून राहिले. कामाच्या बदल्यात धान्य मागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढाववली आणि यातच साक्षीचा आजार बळावला.

हाताला काम नाही घरात पैसा नाही याशिवाय रोजचा खर्च हा ठरलेललाच त्यामुळे उपचार कसे करावेत असा सवाल कांबळे दांम्पत्यासमोर होता. मात्र, त्यांनी हातउसने पैसे जमवून उपचार करण्याची तयारी केली. रविवारी रात्री साक्षीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमुळे वाहनधारक लातूर येण्यास धजवेना. त्यात पोलीसांची चौकशी, कडक बंदोबस्त असे सांगून जो-तो टाळटाळ करू लागला. दरम्यान, बाहेरगावी असलेल्या सरपंच मारुती कांबळे यांनी वाहनाची सोय केली आणि साक्षीला घेऊन घरातील सर्वजण लातूरकडे निघाले. परंतू, नियतिला हे मान्य नव्हते शासकीय रुग्णालय चार किमी असताना साक्षीचा मृत्यू झाला.

वेळीच वाहनाची सोय झाली असती तर कदाचित साक्षीचे प्राण वाचलेही असते. या दुर्घटनेत जीवन कांबळे यांनी आपल्या मुलीला तर गमावले आहेच पण आता चिंता आहे ती मुलाची, कारण त्यालाही याच आजाराने ग्रासलेले आहे. कांबळे कुटूंबियांची परस्थिती हालाकीची असल्याने त्यांना सरकारने आर्थिक मदत करण्याचे अवाहन सरपंच मारुती कांबळे यांनी केले आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.