ETV Bharat / state

जनावरांवर हल्ला करण्याच्या तयारीत असणारी मगर २ तरुणांकडून जेरबंद

गोठ्याजवळच १० फुट लांबीची मगर येऊन म्हशी, गाईंवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून दोरखंडाच्या साहाय्याने मगरीला जेरबंद केले.

author img

By

Published : Mar 28, 2019, 10:55 AM IST

Updated : Mar 28, 2019, 12:14 PM IST

तरुणांनी पकडलेली मगर

कोल्हापूर - गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मगरीला जेरबंद करण्यात दोन तरुणांना यश आले आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील ही घटना आहे.

कोल्हापुरातील सैनिक टाकळी गावात जेरबंद केलेली मगर

गावातील नदीतील पाणी कमी झाल्यामुळे मगरींनी आपला मोर्चा जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यांकडे वळवला आहे. त्यामुळे मगरीपासून मनुष्याबरोबर प्राण्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्याकरीता संदीप आणि सचिन हे दोघे भाऊ शेतातकडे निघाले होते. जाताना गोठ्याजवळच १० फुट लांबीची मगर येऊन म्हशी, गाईंवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून दोरखंडाच्या साहाय्याने मगरीला जेरबंद केले. त्यामुळे जीवितहानी टळली.

वर्षभरामध्ये मगर पकडण्याची ही दुसरी घटना आहे. या मगरींपासून शिरोळ नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अंदाजे २० कुटुंब असलेल्या या वस्तीतील नागरिकांनी धास्तीच घेतली आहे. वन विभागाने तत्काळ या गोष्टीची दखल घेऊन नागरिकांना होणारा मगरीचा त्रास थांबवावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Intro:अँकर- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं गोठ्यात शिरून हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या मगरीला धाडसी तरुणांनी पकडून आपल्या जिविता बरोबर जनावरांच्याही जीविताचे रक्षण केल आहे. घराजवळच असणाऱ्या नदीतील पाणी कमी झाल्यामुळे मगरींनी आपला मोर्चा जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यांच्या कडे वळवला आहे. त्यामुळे मगरी पासून मनुष्याबरोबर प्राण्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे.Body:व्हीओ-२- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सैनिक टाकळी इथं जनावरांच्या साठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्याकरता संदीप आणि सचिन हे दोघे भाऊ शेतात कडे निघाले होते. जाता जाता गोठ्या जवळच १० फुट लाबीची मगर येऊन म्हशी गाईंच्या वर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून दोरखंडाच्या साह्याने मगरीला जेरबंद केले. टाकळी गावाजवळ नदी पासून जवळच असणाऱ्या वस्तीवर आज आपला मोर्चा मगरीने वळवला होता पण धाडसी आणि चाणाक्ष नजरेच्या तरुणांमुळे गोठ्यात जनावरांचा वर होणारा मगरीचा हल्ला थांबवता आला त्यामुळे जीवितहानी टळली.

बाईट- दोन गावकरांचे बाईट

व्हीओ-2- वर्षभरामध्ये मगर पकडण्याची ही दुसरी घटना असून या मगरींच्या पासून शिरोळ नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे अंदाजे वीस कुटुंब राहण्यासाठी असलेल्या या वस्तीतील नागरिकांनी धास्तीच घेतली आहे वन विभागाने तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन नागरिकांना होणारा मगरीचा त्रास थांबवावा अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आला आहे..Conclusion:.
Last Updated : Mar 28, 2019, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.