कोल्हापूर - जिल्ह्यातील कागल येथे एका 27 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. कागल येथील लक्ष्मी मंदिराजवळ मोटारसायकलीवरून पाठीमागून येत दोन अज्ञातांनी अचानक हल्ला करून या तरूणाचा खून केला. अक्षय विनायक सोनुले असे मृत युवकाचे नाव आहे.
हेही वाचा - विशेष : आकडे बोलतात; मुंबईतील एकूण मृत्यूपैकी निम्मे मृत्यू 'या' सात विभागात
प्राप्त माहितीनुसार, अक्षय सोनुले त्याच्या दुचाकीवरून दुपारच्या दरम्यान आपल्या कामाच्या ठिकाणी जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून अचानकपणे आलेल्या दोघांनी लक्ष्मी मंदिरासमोर अक्षयला अडवुन आणि डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने अक्षयवर 15 ते 20 वार केले. हल्ल्यानंतर ते दोघेही तिथून पसार झाले. या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ते आता संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.