कोल्हापूर - कोल्हापूरच्या चंदगड-तिलारी काँझर्व्हेशन ( Chandgad Tilari Conservation ) भागात पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. गोव्याहून कोल्हापूरकडे परत येत असताना चंदगड मधील 6 तरुणांना पट्टेरी वाघ ( Youths from Chandgad Saw Tiger ) दिसला. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चंदगड मुख्य रस्त्यावर तरुणांना वाघ दिसला. त्यानंतर काही अंतरावर पुढे आल्यानंतर त्यांना भल्या मोठ्या गव्याचेही दर्शन ( Gaur Saw in Tilari Ghat ) झाले. या तरुणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे क्षण कैद केले.
'यांना' झाले वाघाचे दर्शन; दृश्य कॅमेरामध्ये कैद
मंगळवार 21 डिसेंबर रोजी पहाटे दीड ते दोन वाजता तिलारी घाट ते कोदाळी मार्गावर वाघाचे दर्शन झाले. चंदगड येथील काही पर्यटक गोवा येथून पर्यटन करून परत येत असताना रात्री त्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यांनी आपल्या मोबाईल वरुन वाघाचे व्हिडिओ शूटिंग केले आहे. तिलारी परिसर हा जैवविविधतेने नटलेला व विविध प्राण्यांचा वावर असणारा प्रदेश म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र आता याठिकाणी वारंवार वाघाचे दर्शन होताना पाहायला मिळत आहे.