ETV Bharat / state

कुस्तीचे फड बंद..! खुराकाचा खर्च काढणार कुठून? अनेक पैलवान कुस्तीला रामराम ठोकण्याच्या मनस्थितीत

author img

By

Published : Nov 3, 2020, 8:51 PM IST

सहा महिन्याच्या टाळेबंदीनंतर राज्य शासनाने जीम, व्यायामशाळा नियम व अटींसह खुल्या करण्याची परवानगी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली आहे. यामुळे जीम प्रेमी आणि व्यावसायिक सुखावले आहेत. परंतु, महाराष्ट्राचा पारंपरिक रांगडा खेळ असलेल्या कुस्तीचे आखाडे, तालमी खुले करण्यास शासनाची परवानगी मिळालेली नाही.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - जत्रा, उरूस, यात्रेत भरवलेल्या कुस्त्यांच्या फडातून आमच्या खुराकाचा खर्च भागतो. आज दारू दुकाने सुरू झाली, बार, हॉटेल, जिम सुरू झाल्या, मग कुस्ती कधी चालू करता? असा प्रश्न राज्यातील पैलवान विचारत आहेत. कुस्ती लवकर चालू झाली नाहीतर अनेकजण कुस्ती क्षेत्राला रामराम करण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

कुस्तीचे फड बंद..! खुराकाचा खर्च काढणार कुठून? अनेक पैलवान कुस्तीला रामराम ठोकण्याच्या मनस्थितीत

कोरोना महामारीतील सहा महिन्याच्या टाळेबंदीनंतर राज्य शासनाने जीम, व्यायामशाळा नियम व अटींसह खुल्या करण्याची परवानगी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली आहे. यामुळे जीम प्रेमी आणि व्यावसायिक सुखावले आहेत. परंतु, महाराष्ट्राचा पारंपरिक रांगडा खेळ असलेल्या कुस्तीचे आखाडे, तालमी खुले करण्यास शासनाची परवानगी मिळालेली नाही. कुस्तीच्या स्पर्धा तसेच आखाडे सुरू करावेत, अशी मागणी पैलवान वर्गाकडून होत आहे.

टाळेबंदीच्या काळात लोकांच्या जगण्याचे चक्र थांबले. कुस्तीची पंढरी कोल्हापूरसह राज्यातील आखाड्यांना टाळे लागले. पैलवानांच्या शड्डूचा आवाज थांबला. मल्लांना गावाकडे परतावे लागले. कुस्तीचे फडही बंद झाल्याने अनेकांची कुस्ती थांबली. सध्या लॉकडाऊन शिथील केला असला तरी कुस्ती आखाडे, तसेच कुस्ती स्पर्धा बंद असल्याने पैलवान अडचणीत आहेत. 'खुराका'ला पैसे नाहीत. अन्‌ खुराकाची सोय झाली तरी सराव कुठे करायचा? असा दुहेरी प्रश्न त्यांच्या समोर आहे.

शासनाला संसर्गाची भिती, पण ...

निवासी आखाड्यात पैलवान एकत्र राहतात. कुस्ती करताना मल्ल एकमेकांच्या शारिरीकरित्या जवळ येत असल्याने संसर्गाची भीती अधिक असते. परंतु, आखाड्यातील मल्लांना बाहेर फिरण्याची मुभा कमी असते. बाहेरील लोकांशी मल्लांचा संपर्क कमी येतो. आखाडा व्यवस्थापकांना बाहेरून सरावासाठी येणाऱ्या मल्लांची तपासणी करत मर्यादित मल्लांना प्रवेश देता येऊ शकतो. या संदर्भात कुस्ती संघटना प्रशासनास काही दिवसांपासून राज्यभर निवेदन देत आहेत. परंतु, राज्यशासन आखाड्यांच्या बाबतीत भूमिका घेताना दिसून येत नाही.

कुस्ती स्पर्धा सुरू होण्याची गरज

तब्बल सहा महिन्यांपासून पैलवान कुस्तीपासून दुरावले आहेत. फड बंद असल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या मल्लांची आर्थिक बाजू चांगली आहे. त्यांचा खुराक सराव सुरू आहे. परंतु, गरीब पैलवानांना पैसे नसल्याने खुराक बंद करत कुस्ती बंद करण्याची वेळ आली आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत ऑनलाईन कुस्ती स्पर्धेचा प्रयोग सध्या पुढे येत आहे. मोजक्‍या लोकांसह सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धा होऊ शकतात. यासाठी शासन आणि प्रायोजक मंडळीची गरज आहे.

कुस्ती, पैलवानकी टिकण्यासाठी परत आखाडे, मैदाने, स्पर्धा सुरू होणे गरजेचे आहे. कुस्तीच्या सरावातील खंड मल्लांची कुस्ती संपवू शकतो. फड सुरू झाले तर पैलवानांना चार पैसे मिळतील. कोल्हापुरात राज्यभरातून मल्ल सरावासाठी येतात, पण ते थांबले आहेत. तरी हवी ती काळजी घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू कराव्यात, असे गंगावेश तालमीतील पैलवान वैभव कुरणे याने सांगितले.

अनेक तरुण सध्या कुस्ती क्षेत्राकडे वळत आहेत. त्यातील बहुतांश तरुण शेतकरी, गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या खुराकाचा खर्च ते जत्रेतील कुस्ती फडातून काढत असतात. मात्र, टाळेबंदीमुळे कुस्ती मैदानात घेण्यावर बंदी आहे. त्यामुळे खुराकासाठी पैसे आणायचे कुठून? हा मोठा प्रश्न पैलवानांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक कुस्ती क्षेत्र सोडण्याच्या मार्गावर आहेत. कुस्ती हा पारंपरिक खेळ रुजवायचा असेल तर कुस्ती सुरू करावी अशी, मागणी कुस्ती अभ्यासक पैलवान मतीन शेख यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.