ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'या' कला शिक्षकाने साकारले जगातले सर्वात लहान आकाराचे शिवरायांचे चित्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक प्रकराचे चित्र आतापर्यंत आपण पाहिले आहेत. मात्र हे चित्र चक्क तिळावर काढण्यात आले असून हे जगातील सर्वात लहान आकाराचे चित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे.

author img

By

Published : Aug 12, 2020, 8:05 PM IST

शिवाजी महाराजांचे चित्र
शिवाजी महाराजांचे चित्र

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची आजपर्यंत जगभरात विविध आकारांमध्ये आणि विविध प्रकारे चित्र साकारल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, कोल्हापुरातील एका कलाकाराने चक्क 'तिळावर' चित्र काढण्याची किमया साधली आहे. अशांत मोरे असे या कलाकाराचे नाव असून महाराजांचे हे जगातील सर्वात छोटे चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही मोरे यांनी अनेक छोटी चित्र काढली आहेत. मात्र, पहिल्यांदाच त्यांनी तिळावर सुंदर असे चित्र साकारले आहे आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे शक्य झाले आहे.

शिवाजी महाराजांचे तिळावरील चित्र

मायक्रो आर्टिस्ट म्हणून त्यांनी कोल्हापुरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. ते सर्प आणि प्राणी-पक्षी प्रेमीसुद्धा आहेत. सध्या ते कला शिक्षक म्हणून एका खाजगी शाळेत काम करतात. त्यांना अशाच विविध कलाकृती करण्याचा छंद आहे. त्यांनी या छंदामधूनच आत्तापर्यंत जवळपास 20 ते 25 मायक्रो आर्टद्वारे छोट्यात छोटी चित्रे काढली आहे. यामध्ये छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, स्वामी समर्थ महाराज, दादा कोंडके, अण्णाभाऊ साठे, शरद पवार अशा अनेकांचे समावेश आहे. पेंन्सिलच्या लीडवर सुद्धा त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकृती साकारल्या आहेत. नुकतेच यांनी तांदळावर चित्र साकारले होते. त्यानंतर झालेल्या अनेक गौरवांची ऊर्जा घेत आता त्यांनी तिळावर चित्र साकारले आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..

त्यांनी काढलेले चित्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते जगातील सर्वात लहान चित्र असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. या चित्राचा आकार 1 mm × 1.5 mm इतका असून इतके लहान चित्र आजपर्यंत कोणीही काढले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे चित्र काढण्यासाठी त्यांना जवळपास अडीच तासांचा वेळ लागला असून पहिल्याच प्रयत्नांत त्यांनी इतके सुंदर आणि सफाईदारपणे हे चित्र काढून पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा घरीच तयार केलेला ब्रश वापरला. तिळावर चित्र असल्याने व्हिडिओ अथवा फोटोमध्ये हे चित्र व्यवस्थित पाहता येत नाही. प्रत्यक्षात मात्र हे चित्र पाहून प्रत्येकजण मनापासून कौतुक करेल एवढे सुरेख आहे.

हेही वाचा - देशात कौटुंबिक हिंसाचारात 86 टक्के वाढ; पण लॉकडाऊनमुळे दाखल झालेल्या एवढ्याच तक्रारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.