कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली असून राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. पळवापळवीच्या राजकारणालाही ऊत आला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?
राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ किंवा शाहुवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आघाडीच्या घटक पक्षांकडून आणि राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
आघाडीच्या घटक पक्षांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडणार असल्याची माहिती आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी हेच घटक पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या
दरम्यान, राजू शेट्टी यांनी नुकतेच चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा माझा विचार आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे राजू शेट्टी स्वत:हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार की नवीन चेहऱयांना संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
हेही वाचा - हमें नया कश्मीर बनाना है, मोदी बोलले लोक उसळले
लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला. मात्र आता राजू शेट्टी शिरोळ या विधानसभा मतदारसंघातून रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
...तर राजू शेट्टी यांचा सामना जुन्या सहकाऱ्यासोबतच
सध्या शिरोळ मतदारसंघात राजू शेट्टी यांचे जुने सहकारी आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. जर राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले तर त्यांचा सामना जुन्या सहकाऱ्याविरोधातच होईल. त्यामुळे आता राजू शेट्टी यांच्या अंतिम निर्णयाकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच शिरोळ येथील नगरपरिषद स्वाभिमानी आणि आघाडीने जिंकली असून सध्या येथे स्वाभिमानी संघटनेचे नगराध्यक्ष आहेत.
शिरोळ विधानसभा मतदारसंघ; परिस्थिती 2014 ची -
शिरोळ मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद असलेला मतदारसंघ आहे. मात्र, याठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. 2014 मध्ये स्वाभिमानीतून बाहेर पडून उल्हास पाटील यांनी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले.
स्वाभिमानी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात उल्हास पाटील हे त्यावेळी सक्रिय होते. मात्र, 2014 मध्ये त्यांनी स्वाभिमानीच्या उमेदवाराबरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विजय मिळवला. त्यावेळी उल्हास पाटील यांना 7 हजार 809 मतं मिळाली तर त्या खालोखाल राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ५० हजार ७७७ मतं मिळाली होती. त्यामुळे आगामी विधानसभेला कुणाची ताकद दिसून येते हे पाहणे महत्तवाचे असणार आहे.