कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाची शैली सर्वश्रुत आहे. कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेदरम्यान याची प्रचिती आली.
काही दिवसांपूर्वी एका पत्रकारावर रागावलेले पवार सगळ्यांनी पाहिले. पण राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के.पी पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवारांनी अशी दोन वक्तव्य केली की संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
हेही वाचा नाराज जनतेसाठी सत्ताधारी निवडणुकीच्यावेळी भावनिक मुद्दे काढतात - शरद पवार
नेत्यांची भाषणे सुरू असताना माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह उमेदवार के.पी पाटील यांनी भाषणांमध्ये शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला होता. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील यांनीही हा उल्लेख केला होता.
यानंतर पवार भाषणासाठी उभे राहिले आणि 'अभी तो मै जवान हुँ' असं मिश्किलपणे भाषणातून सांगितलं, आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच कल्लोळ झाला. के.पी पाटील यांचे मेहुणे ए.वाय पाटील असल्याने, 'मेव्हण्यांची भांडण महागात पडतात' असं बोलून, स्वत:चे मेहुणे एन.डी पाटील यांच्याशी असलेले राजकीय वैर व राजकारणाचा खुलासा केला.