ETV Bharat / state

महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल - मुख्यमंत्री

महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसलाही फटका बसणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

मुख्यमंत्री फडणवीस
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:00 PM IST

Updated : Sep 16, 2019, 11:36 PM IST

कोल्हापूर - जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याही प्रकारचा फटका बसणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहतील, असे नियोजन सुद्धा केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

बोलताना मुख्यमंत्री

ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत महापूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. शिवाय महापूर स्थितीवर कायमस्वरूपी आणि शाश्वत प्रकारची उपाययोजना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांच्या हक्काचे पाणी आहे. त्याहूनही अधिक पाणी महापुरामुळे वाया जाते. राज्याच्या एका भागात महापूर आणि दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा अशी विसंगत स्थिती निर्माण झाल्याचे दिसते. हे चित्र बदलण्याचा निर्धार राज्य सरकरने केला आहे. त्यासाठी जागतिक बँकेचे २३ तज्ज्ञांचे पथक पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा आढावा घेऊन गेले. त्यातून अशा प्रकारच्या योजनेचे नियोजन केले जाईल की वीज, पाणी पुरवठा, रस्ते, पूल हे महापूर काळातही बंद न पडता सुरू राहतील.

पुराचे पाणी दुष्काळी भागाला जाऊन तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यात पूरस्थिती येणार नाही, अशी कायमची व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागेल. जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांनीही या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

७० वर्षांत काँग्रेसला जमले नाही ते मोदी नावाच्या वाघाने करून दाखवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे, असा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, तिहेरी तलाक बाबतचा कायदा आल्याने त्याचे स्वागत करत मुस्लिम महिलांनी मला आज राखी भेट स्वरूपात दिली. मागील ७० वर्षांत काँग्रेसला करता आले नाही हे काश्मीर मधील ३७० कलम हटवण्याचे काम मोदी नावाच्या वाघाने करून दाखवले. त्यामुळे यंदा प्रथमच देशाच्या सर्व भागप्रमाणे काश्मीरमध्येही तिरंगा ध्वज फडकू शकला. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी ही जनादेश यात्रा काढली आहे. त्याला तुमचा प्रतिसाद असावा, असा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.

Intro:पहिला बातमी लावा,

अँकर : जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याही प्रकारचा फटका बसणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. शिवाय वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहतील असे नियोजन सुद्धा केले जाणार असल्याचे त्यांनी म्हंटलंय. इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.Body:व्हीओ : ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत महापूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. शिवाय महापूर स्थितीवर कायमस्वरूपी आणि शाश्वत प्रकारची उपाययोजना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांच्या हक्काचे पाणी आहे त्याहूनही अधिक पाणी महापुरामुळे वाया जाते. जिल्ह्याच्या एका भागात महापुर आणि दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा अशी विसंगत स्थिती निर्माण आल्याचे दिसते. हे चित्र बदलण्याचा निर्धार राज्य सरकरने केला आहे. त्याकरिता जागतिक बँकेचे 23 तज्ज्ञांचे पथक पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा आढावा घेऊन गेले. त्यातून अशा प्रकारची योजनेचे नियोजन केले जाईल की विज, पाणी पुरवठा, रस्ते, पूल हे महापूर काळातही बंद न पडता निर्वेदपणे सुरू राहतील. पुराचे पाणी दुष्काळी भागाला जाऊन तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. या तिन्ही जिल्ह्यात पूरस्थिती येणार नाही अशी कायमची व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी 5 ते 6 वर्षांचा अवधी लागेल. जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांनीही या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्ये करण्याचे मान्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

*70 वर्षात काँग्रेसला करता आले नाही ते मोदी नावाच्या वाघाने करून दाखवले : फडणवीस*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे. असा उल्लेख करून ते म्हणाले तिहेरी तलाकचा कायदा केल्याने त्याचे स्वागत मुस्लिम महिलांनी करून मला आज राखी भेट स्वरूपात दिली. गेल्या 70 वर्षात काँग्रेसला करता आले नाही हे काश्मीर मधील 370 कलम हटवण्याचे काम मोदी नावाच्या वाघाने करून दाखवले. त्यामुळे यंदा प्रथमच देशभरात देशाच्या सर्व भागप्रमाणे काश्मीरमध्येही तिरंगा ध्वज फडकू शकला. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी ही जनादेश यात्रा काढली आहे. त्याला तुमचा प्रतिसाद असावा असा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला. Conclusion:.
Last Updated : Sep 16, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.