कोल्हापूर - पाण्यासाठी दोन गावांमधील ग्रामस्थांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाटणे आणि जेलूगडे अशी या गावांची नावे आहेत.
पाण्याच्या एकाच स्त्रोतामुळे दोन गावांमध्ये हा वाद झाला आहे. या दगडफेकीमध्ये एकूण आठ जण जखमी झाले आहेत. चंदगड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. मात्र, या दगडफेक प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. याच काळात दोन्ही गावातील वाद उफाळून आला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - Mother's Day : मम्मा लवकर ये.. मला आठवण येतेय! 52 दिवसांपासून मायलेकांची ताटातूट