ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये जप्त केलेली वाहने ४ मे नंतर परत मिळणार, भरावा लागणार 'इतका' दंड - lockdown news in Kolhapur

शहरात लॉकडाऊन दरम्यान जवळपास ५ हजार वाहने जप्त केली आहेत. ती सर्व टप्प्याटप्प्याने वाहन मालकाकडे दिली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली आहे.

Vehicles seized in the lockdown will be returned after May 4
लॉकडाऊनमध्ये जप्त केलेली वाहने ४ मे नंतर परत मिळणार, भरावा लागणार 'इतका' दंड
author img

By

Published : Apr 27, 2020, 3:13 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊनमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने आता ४ मे नंतर टप्प्याटप्प्याने वाहन मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून केवळ ३०० रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. तर, इतर दंड माफ केले जाणार आहे.

Vehicles seized in the lockdown will be returned after May 4
लॉकडाऊनमध्ये जप्त केलेली वाहने ४ मे नंतर परत मिळणार

शहरात लॉकडाऊन दरम्यान जवळपास ५ हजार वाहने जप्त केली आहेत. ती सर्व टप्प्याटप्प्याने वाहन मालकाकडे दिली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली आहे. वाहने ताब्यात देत असताना वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. वाहन घेण्यासाठी येताना गर्दी करु नये म्हणून ४ ते १३ मे पर्यंत ही वाहने दिली जाणार आहेत. सकाळी ८ ते १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत वाहनं ताब्यात देण्यात येणार आहे. ही वाहने १ ते ५०० तसेच ५०१ ते १००० या पावती क्रमांकाने दिली जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.