ETV Bharat / state

कोल्हापूर : भाजीपाला विक्रेता नफ्यात, शेतकरी तोट्यात; ग्राहकाचा खिसा रिकामा - कोल्हापूर भाजीपाला भाववाढ

यंदा पाऊसमान चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. लॉकडाऊन, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाजारात दर कमी मिळत आहेत. असे असले तरी विक्रेत्यांनी याचा फायदा घेत मनमानी पद्धतीने दर वाढवून ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Sep 1, 2020, 5:04 PM IST

कोल्हापूर - भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिम भाववाढ करून नागरिकांकडून लूट सुरू केली आहे. पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजीपाल्याचे उत्पन्न घेणारा शेतकरी मात्र प्रचंड तोटा सहन करत आहे. यंदा पाऊसमान चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. लॉकडाऊन, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाजारात दर कमी मिळत आहेत. असे असले तरी विक्रेत्यांनी याचा फायदा घेत मनमानी पद्धतीने दर वाढवून ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर
आज बाजारपेठ, भाजी मंडईत पालेभाज्या, फळे, फुले यांची मोठ्या प्रमाणावर आवक असतानाही ग्राहकांना दुप्पट दराने वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. त्यावर ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बाजारात पुरवठा कमी झाल्यावर निश्‍चित दर वाढतात. मात्र, दहा दिवसांची एकदाच खरेदीसाठी नागरिक येत असल्याने दरामध्ये वाढ झाली असल्याचे भाजी विक्रेते अल्लाबक्ष मुल्लानी यांनी सांगितले. ग्राहक वृषाली राणे म्हणाल्या, "मागील तीन महिने आम्ही लॉकडाऊनमध्ये काढले आहेत. त्या दरम्यान हाताला काम नाही. तर दुसऱ्या बाजूला भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे आता आम्ही कसे जगायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता तरी सरकारने या वाढत्या भावांवर लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा - कोल्हापुरात पुन्हा लाॉकडाऊन? प्रशासनाकडून हालचाली सुरू

कल्पना पाटील म्हणाल्या, "30 रुपये किलो मिळणारे टोमॅटो आता ६० रुपये किलोला मिळत आहेत. टोमॅटो घ्यावा की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. असेच भाव वाढत राहिले तर, खायचं काय? असे विचार येत आहेत. फळभाज्या, कांदे, बटाटे, लसूण-आलं विक्रीतून मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. मेथी, शेपू, कोथिंबीर महागली असून, प्रती जुडी 20 ते 30 रुपये मोजावे लागत असल्याने गृहिणींनी मनस्ताप व्यक्‍त केला. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याने घरचे बजेट कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

२०१९ च्या महापुराचा आजही परिणाम

गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील ८९० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले होते. अनेक दिवस पाणी व गाळ साचून राहिल्याने जमीन क्षारपट बनली. त्यामुळे यंदा भाजीपाला उत्पन्नावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. आणखी दोन वर्षे भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दर नव्हे, तर रासायनिक खत, नैसर्गिक संकट, हवामान, खर्च अशा संकटाचा सामना करावा लागत आहे.

जिल्हानिहाय पिक नुकसान (२०१९)

जिल्हा नुकसान (हेक्‍टर)
सातारा38 हजार 225
सांगली66 हजार 069
कोल्हापूर1 लाख 05 हजार

तालुकानिहाय पिकाखालील क्षेत्र (हेक्टर)

हातकणंगले-६६८.५०
शिरोळ-५३३
करवीर-२१५
आजरा-२०२
भुदरगड-४.८०
राधानगरी-२६
पन्हाळा-२१०
शाहूवाडी-४०
चंदगड-१९८९
गगनबावडा-२
कागल-४६४

सण २०१९ मध्ये आलेल्या महापुरात झालेले भाजीपाल्याचे नुकसान व कंसात २०२० चे नुकसान (हेक्टर)

हातकणंगले- ९०.१८ (३०.५०)
शिरोळ-४७१.७६ (५)
करवीर- ५६.१५ (०)
आजरा- २६.११(५.८०)
भुदरगड-०(१.२०)
राधानगरी-३९.१९(०)
पन्हाळा-५४.६३(०)
शाहूवाडी-१.७२(०)
चंदगड-०(०.५०)
गगनबावडा-०(०)
कागल-५७.३१(०)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.