कोल्हापूर : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक (Thackeray Group Affidavit Verification by Police) कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत. पोलीस अधीक्षकांचे कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकरे यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडेचार हजार प्रतिज्ञापत्र बोगस (Uddhav Thackeray group submitted bogus affidavit) असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला (allegation of Shinde group on Thackeray) जात आहे. ठाकरे गटाच्या शपथपत्रांवरती शिंदे गटाने आक्षेप (bogus affidavit allegation of Shinde group) घेतला असून निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्र सादर झालेली आहेत; परंतु ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप केला गेल्यानंतर याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता आपला तपास सुरू केला आहे. (Shinde Group objection on Thackeray Group)
आम्ही प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली आहेत : ज्या जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधात जास्त आंदोलन केली जातात त्या जिल्ह्यामध्ये ही कारवाई केली जाते. आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली आहेत. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रँचला आमचे सर्व ते सहकार्य राहील असे ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हंटले आहे.