कोल्हापूर - पूरग्रस्त भागात योजना राबवताना काही अडचण येऊ नये, यासाठी आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलाव्यात, असे मत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे. तृप्ती देसाई तीन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत.
यावेळी येथील गडहिंग्लज तालुक्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करून त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. शिवाय भुमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्यावतीने साड्या तसेच ब्लँकेटचे वाटप सुद्धा करण्यात आले.
यावेळी बोलताना देसाई म्हणाल्या, जिल्ह्यात जी घरे पडली आहेत, ती शासनाने लवकरात लवकर बांधून द्यावी. तसेच पूरग्रस्त भागात योजना राबवताना काही अडचण येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी 6 महिने निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.