ETV Bharat / state

तिलारी घाटात रस्ता खचला; १५ जुलैपर्यंत घाटातील वाहतूक बंद - वाहतूक

घाटात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तिलारी घाटात दरड कोसळली. रस्ता खचल्याने १५ जुलैपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तिलारी घाटातील रस्ता खचला
author img

By

Published : Jul 6, 2019, 1:50 PM IST

कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानंतर रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान रस्ता खचल्याने १५ जुलैपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

तिलारी घाट हा कोल्हापूर आणि गोवा राज्याला जोडणार दुवा आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणारा हा घाट अत्यंत धोकादायक या मार्गावरुन वाहतूक अत्यंत तुरळक असते. घाटात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आज सकाळी ८ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास तिलारी घाटात दरड कोसळली आणि रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. फक्त या मार्गावरुनच गोवाकडे दुध, भाज्या आणि इतर सामानाची वाहतूक करण्यात येते, त्यामुळे दोन्ही राज्यांसाठी महत्वाचा मार्ग आहे.

तिलारी घाटातील रस्ता खचला

पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे काम सध्या सुरू आहे. तिलारी घाटातील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आंबोली, सावंतवाडी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. याबरोबरच बेळगाव आणि चंदगड येथून दोडामार्ग आणि गोव्याला जाणाऱ्या एसटीच्या १२ फेऱ्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Intro:अँकर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानंतर रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून सध्या या मार्गावरून एकरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिलारी घाट हा कोल्हापूर आणि गोवा राज्याला जोडणार दुवा आहे. हा घाट अत्यंत धोकादायक असल्याने या मार्गावरून वाहतूक अत्यंत तुरळक असते. आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तिलारी घाटात दरड कोसळली आणि रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. सध्या या ठिकाणी शासकीय अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे काम सध्या सुरू आहे. Body:.Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.