ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'चंदगड संवर्धन राखीव' क्षेत्रात रेड्याची शिकार; पुन्हा आढळला वाघाचा अधिवास

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दक्षिणेकडील कर्नाटक मधील दांडेली, महाराष्ट्रातील तिलारी, आजरा, चंदगड, विशालगडमार्गे उत्तरेतील चांदोली, कोयनापर्यंत वाघ भ्रमण करीत असतो. राज्य सरकाराने 5 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि 22 हजार 523 हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती.

रेड्याची शिकार
रेड्याची शिकार
author img

By

Published : Nov 25, 2021, 6:49 AM IST

Updated : Nov 25, 2021, 11:46 AM IST

कोल्हापूर - 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये (Chandgad Conservation Reserve) पट्टेरी वाघाने शिकार (Tiger hunts) केली आहे. त्यामुळे या वनक्षेत्रात वाघाचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका रेड्याची शिकार करून त्याचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले आहे. शिवाय त्याच्या आजूबाजूला पायाचे ठसेही आढळून आल्याने हा पट्टेरी वाघ असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग (Wildlife trail) जोडला तर गेलाच आहे. शिवाय तो संरक्षित सुद्धा झाला असल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

अर्धवट खाल्लेल्या स्थितीत रेडा आढळला -

दरम्यान, अर्धवट खाल्लेल्या स्थितीत एक पूर्ण क्षमतेने वाढलेला मृत रेडा आढळून आला. त्याच्या मागील बाजूने वाघाने झडप मारून शिकार केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाघाने रेड्याला अनेक फूट लांब फरफटत ओढत नेल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान मृत रेड्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे या सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

रेड्याची शिकार
रेड्याची शिकार

आंबोली परिसरात सुद्धा वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ कैद -

दरम्यान 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये पट्टेरी वाघाने शिकार केल्याने या वनक्षेत्रात वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. मात्र यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच त्याने केलेल्या शिकारीचे पुरावे मिळाले आहेत. मागील वर्षीच लाॅकडाऊनच्या काळात आंबोली परिसरात (Amboli Area) वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्र कैद झाले होते.

वाघाच्या पायाचे ठसे
वाघाच्या पायाचे ठसे

'या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास -

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दक्षिणेकडील कर्नाटक मधील दांडेली, महाराष्ट्रातील तिलारी, आजरा, चंदगड, विशालगडमार्गे उत्तरेतील चांदोली, कोयनापर्यंत वाघ भ्रमण करीत असतो. राज्य सरकाराने 5 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि 22 हजार 523 हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. त्यापूर्वी 29.53 चौरस किमीच्या 'तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची (Tilari Conservation Reserve) स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग (Wildlife trail) जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे या तीनही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास आहे.

Last Updated : Nov 25, 2021, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.