कोल्हापूर: राज्यात आणि देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना टोमॅटोची विक्री दीडशे ते दोनशे रुपये किलोच्या दराने सुरू आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असली तरी टोमॅटोमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. मात्र, हेच चांगले दिवस काही समाजकंटकांना बघवत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण टोमॅटोची रोपटे उपटून टाकण्याची घटना ताजी असतानाच आता रात्रीचा फायदा घेत टोमॅटो चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडमध्ये ही घटना घडली असून अशोक मस्के यांच्या 20 गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरून नेण्यात आले.
25 कॅरेट टोमॅटो चोरीला: आज पर्यंत आपण सोने, गाडी, पैसा अश्या गोष्टी चोरी झाल्याचे ऐकत होतो. मात्र, चोरटोचीही चोरी होईल, असा कोणी विचार केला नव्हता. टोमॅटो आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याने चोरांनी चक्क टोमॅटो चोरीलाही सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतातली तब्बल 20 गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरून नेले आहे. म्हस्के हे दरवर्षी भाजीपाल्याची शेती करतात. यंदा 25 गुंठ्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली.
50 हजार रुपयांचे नुकसान: अशोक म्हस्के हे मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतात येत पिकाची पाहणी करून टोमॅटो तोडण्याच्या नियोजनात होते; परंतु शेतात आल्यानंतर टोमॅटोच नसल्याने त्यांना धक्का बसला. यामुळे शेतकऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोचे पीक घेण्यात आले होते. अंधार आणि पावसाचा फायदा घेत तसेच सीसीटीव्हीला चकवा देत चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास सुरू करत आहे.
जिल्ह्यात 15 दिवसात दुसरी घटना: दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वीच एका समाजकंटकाने शेतकऱ्याच्या शेतातील टॉमेटो उपटून टाकल्याने त्याचे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले होते. कोल्हापुरातील सांगवडेवाडी येथील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली होती. यानंतर 15 दिवसातच ही दुसरी घटना घडली असल्याने टोमॅटोसाठी आता पोलीस बंदोबस्त घ्यावा लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
हेही वाचा: